सु.वा. जोशी
Appearance
सुधाकर वामन जोशी (जानेवारी १९, इ.स. १९४१ - ) हे औरंगाबाद येथे २३,२४ फेब्रुवारी २००२ रोजी झालेल्या दहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.
यांनी प्रकाशक होण्यापूर्वी जुनी पुस्तके विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर उत्कर्ष बुक सर्व्हिस, उत्कर्ष ग्रंथालय आणि उत्कर्ष प्रकाशन या संस्था सुरू केल्या. १९७१ साली साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकाने उत्कर्ष प्रकाशनाचा श्रीगणेशा झाला. भा. रा. भागवत, शांता शेळके, रविंद्र पिंगे, रा. चिं. ढेरे, गंगाधर गाडगीळ अशा दिग्गज लेखक मंडळींची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. श्रीपाद जोशी यांच्या ‘मी पाहिलेले गांधीजी’च्या ४थ्या आवृत्तीचेही तेच प्रकाशक होते. उत्कर्ष प्रकाशनाने ८६८हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत.
एक तपाहून अधिक काळ आळंदी देवस्थान येथे विश्वस्त म्हणून सेवारत आहेत.