शिया इस्लाम
शिया या इस्लाम धर्मातील एक पंथ आहे. एका निष्कर्षानुसार जगभरातील १.५ अब्ज मुसलमानांपैकी १० ते १५ टक्के (१५ कोटी) शिया पंथीय आहेत. सुन्नी पंथियांच्या तुलनेत शिया पंथाचे आचारविचार, धर्मविषयक विचार भिन्न असतात. महम्मद पैगंबरांनंतर दूत 13पाठवण्याऐवजी इमामांची नियुक्ती केली जावी या विचारांचे ते समर्थक आहेत. पैगंबरांच्या निधनानंतर त्यांचे जावई हजरत अली यांना शियापंथीय उत्तराधिकारी म्हणून मानतात. शियांच्या म्हणण्यानुसार पैगंबरांनीही अली यांनाच उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं होतं. पण, हजरत अबू बकर यांनी फसवून प्रमुखपदी वर्णी लावून घेतली. शियापंथीय मुसलमान पैगंबरांनंतरच्या तीन खलीफांना नेता मानत नाहीत. ते त्यांना गासिब असं म्हणतात. गासिब अरबी शब्द आहे. हडपणे असा त्याचा अर्थ होतो. शियापंथीयांनुसार अल्लाने मोहम्मद यांना पैगंबर म्हणून पाठवलं होतं. त्याच धर्तीवर मोहम्मद यांचे जावई अली यांना अल्लानेच इमाम/नबी म्हणून पाठवलं होतं. त्यांची मुलं पुढचे इमाम होत गेले. पुढे जाऊन शिया पंथातही अनेक गट पडले — इस्ना अशरी, जैदिया, इस्माइली शिया, दाऊदी बोहरा, खोजा, नुसैरी इ.