"वि.वा. शिरवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६२: ओळ ६२:


===आठवणीपर===
===आठवणीपर===
*वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
*[[वाटेवरच्या सावल्या]](पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)


==पुरस्कार==
==पुरस्कार==

१३:१०, ३ जुलै २०१० ची आवृत्ती

विष्णु वामन शिरवाडकर,(१९३७-१९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककारसमीक्षक आहेत. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले आहे. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.

जीवन

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य केले.

लेखनशैली

सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केलेली आहे. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कवितांबरोबरच त्यांनी अनेक नाटकेही लिहलेली आहेत. याशिवाय कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकारही त्यांनी हाताळलेले आहेत.

कारकीर्द

पुस्तके

कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कविता संग्रह

  • जीवन लहरी
  • विशाखा
  • किनारा
  • मराठी माती
  • हिमरेषा
  • छंदोमयी
  • स्वगत
  • वादळ वेल
  • मेघदूत
  • रसयात्रा (निवडक कविता)

निबंध संग्रह

नाटक

  • दूरचे दिवे
  • दिवाणी दावा
  • आमचं नाव बाबुराव
  • वैजयंती
  • नाटक बसते आहे
  • बेकेट
  • आनंद
  • राजमुकुट
  • देवाचे घर
  • एक होती वाघीण
  • मुख्यमंत्री
  • वीज म्हणाली धरतीला
  • ऑथेल्लो
  • विदूषक
  • जेथे चंद्र उगवत नाही
  • दुसरा पेशवा
  • कौंतेय
  • ययाति देवयानी
  • नटसम्राट

कथासंग्रह

  • फुलवाली
  • काही वृद्ध काही तरुण
  • सतारीचे बोल
  • अपॉईंटमेंट
  • बारा निवडक कथा

कादंबरी

  • वैष्णव
  • जान्हवी
  • कल्पनेच्या तीरावर

आठवणीपर

पुरस्कार

त्यांच्या विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बाह्यदुवा

कुसुमावली