"त्रिभुज प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[Image:हुगळीत्रिभूजप्रदेश.jpg|right]]
'''त्रिभूज प्रदेश''' म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहुन आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश साधारणत: पात्राला अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.
'''त्रिभूज प्रदेश''' म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहुन आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश साधारणत: पात्राला अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.



१५:२२, २९ मार्च २००५ ची आवृत्ती

त्रिभूज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहुन आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश साधारणत: पात्राला अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.

त्रिभूज प्रदेश निर्मिती

नदीच्या शेवटच्या टप्प्यात जेंव्हा नदी समुद्राला मिळते त्यावेळी नदीच्या प्रवाहाचा वेग कमी होतो त्यावेळी प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदी मुखाशी टाकले जातात. सर्वात पहिल्यांदा खडी आणि वाळू जमा होतात कारण ते जड असतात. माती समुद्रात आतपर्यंत वाहुन नेली जाते कारण ती हलकी असते. जेंव्हा खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात ती जड होते आणि खाली बुडते. अश्या गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभूज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढुन त्याला स्थिरता देतात.

त्रिभूज प्रदेश निर्मिती ही नदीवर अवलंबुन असते आणि लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा जास्त परिणाम होताना दिसत नाही. बऱ्याच वेळा त्रिभूज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे विविध फाटे पडल्यासारखा असतो.

सर्वात प्रसिद्ध त्रिभूज प्रदेश नाईल नदीवर आहे. गंगा-ब्रम्हपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधिल त्रिभुजप्रदेश, कृष्णा, गोदावरी, कावेरी, अॅमेझॉन, म्मिसिसीपी, ऱ्हाईन, डॅन्युब इत्यादी नद्यांचे त्रिभूज प्रदेश ही प्रसिद्ध आहेत.