"जनावरांचे वजन मोजणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
पान '<br /> वर्ग:शेतीपूरक व्यवसाय' वापरून बदलले. खूणपताका: आशय-बदल पान कोरे केले दृश्य संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
<br /> |
|||
जनावरांचे वजनः |
|||
जनावरांचे वजन नियमीत मोजल्यामुळे पशुपालकास |
|||
१. जनावरांचे आरोग्य सामान्य आहे कि कसे ते समजते |
|||
२. वजना मध्ये किती वाढ/घट झाली आहे समजते व आहारात त्या अनुषंगाने बदल करता येतो. |
|||
३. जनावरांना वजनाच्या तुलनेत किती व काय आहार दिला गेला पाहिजे याचे सुत्र ठरवता येते |
|||
४. औषधी देण्याचे प्रमाण वजनावर अवलंबून असते. ते योग्य वजन समजल्यामुळे योग्य प्रमाणात देता येतात. |
|||
________________________________________________ |
|||
जनावरांचे वजन करण्याच्या पद्धती: |
|||
१. प्रत्यक्ष पद्धत |
|||
२. अप्रत्यक्ष पद्धत |
|||
<nowiki>************************************************</nowiki> |
|||
१. प्रत्यक्ष पद्धत: या मध्ये वजन काटा, वजन पूल, इत्यादींचा वापर करून जनावारंचे वजन केले जाते. शेळी /मेंढी, कोंबडी यांचे वजन वजनकाटा, स्प्रिंग काटा वापरून सहज करता येते. पण मोठ्या जनावरांचे वजन करण्याकरिता वजन पूल सारखा मोठा वजन काटा लागतो. |
|||
वजन पूलची सुविधा सर्वसामान्य पशुपालाकांकडे उपलब्ध नस्ते. अशा वेळेस अप्रत्यक्ष पद्धत उपयोगी ठरते. |
|||
________________________________________________ |
|||
२. अप्रत्यक्ष पद्धत: या मध्ये गणिती सुत्र वापरून वजनाचे अनुमान लावले जाते. |
|||
<nowiki>************************************************</nowiki> |
|||
अ. शाफेरचे सूत्र (Shaffer's formula): हे सूत्र सर्वसाधारणपणे गाई म्हशींचे वजन मोजण्याकरिता वापरले जाते. पण लहान वासारंचे वजन करण्यासाठी हे सूत्र तितके अचूक नाही. |
|||
सूत्र: W= L X G X G /330 |
|||
W - वजन (पौंड मध्ये) |
|||
L - गाईची लांबी (इंचात) पुढच्या खांद्याजवळ व शेपटी जवळील कंबरेच्या हाडापर्यंत मोजावी |
|||
G - गाईच्या छातीचा घेर (इंचात) मोजावा. असा घेर पाठीवरील जास्तीत जास्त उंचवट्या जवळ मोजावा |
|||
<nowiki>************************************************</nowiki> |
|||
ब. मिनेसोटा सूत्र (Minessota Formula): या मध्ये वरीलप्रमाणेच जनावराचे वजन फक्त किलोग्राम मध्ये प्राप्त होते |
|||
सूत्र: W= L X G X G /660 |
|||
W - वजन (किलो मध्ये) |
|||
L - गाईची लांबी (इंचात) पुढच्या खांद्याजवळ व शेपटी जवळील कंबरेच्या हाडापर्यंत मोजावी |
|||
G - गाईच्या छातीचा घेर (इंचात) मोजावा. असा घेर पाठीवरील जास्तीत जास्त उंचवट्या जवळ मोजावा |
|||
<nowiki>************************************************</nowiki> |
|||
क. अग्रवाल यांचे सुधारित शाफेर सूत्र (Aggarwal's modified Shaeffer's formula): भारतीय गायींकरिता हे सूत्र बनविण्यात आले आहे. या मध्ये जनावराचे वजन SEERs मध्ये मिळते |
|||
1 SEER = 0.93 Kg |
|||
सूत्र: |
|||
W (in seer) = G X L /Y |
|||
W - वजन (SEER मध्ये) |
|||
L - गाईची लांबी (इंचात) पुढच्या खांद्याजवळ व शेपटी जवळील कंबरेच्या हाडापर्यंत मोजावी |
|||
G - गाईच्या छातीचा घेर (इंचात) मोजावा. असा घेर पाठीवरील जास्तीत जास्त उंचवट्या जवळ मोजावा |
|||
Y - Y ची किंमत खालील प्रमाणे ठरते |
|||
Y= ९. ० ~ छातीचा घेर ६५ पेक्षा कमी असल्यास. |
|||
Y= ८. ५ ~ छातीचा घेर ६५-८० इंच मध्ये असल्यास. |
|||
Y= ८.० ~ छातीचा घेर ८० पेक्षा जास्त असल्यास. |
|||
<nowiki>**********************************************</nowiki> |
|||
४. मुलीक यांचे म्हशींकरिता सूत्र (Mullick formula for buffalo): |
|||
सूत्र: X = २५. १५६ (Y ) - ९६०.२ |
|||
X - वजन पौंड मध्ये |
|||
Y- छातीचा घेर इंचात |
|||
वरील सुत्रांचा उपयोग जनावरांचे वजन मोजण्यासाठी करता येऊ शकतो. |
|||
<nowiki>**********************************************</nowiki> |
|||
Note: |
|||
१ kg = २.२ pound |
|||
१ Seer = ०.९३ kg<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.facebook.com/pashutantragyan/posts/997609607012824/|title=जनावरांचे वजनः|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref> |
|||
[[वर्ग:शेतीपूरक व्यवसाय]] |
[[वर्ग:शेतीपूरक व्यवसाय]] |
१४:३९, ४ मे २०२० ची आवृत्ती