Jump to content

विजय यंगलवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. विजय गोविंदराव यंगलवार (जन्म : भंगारम तळोधी-चंद्रपूर जिल्हा, ८ एप्रिल १९५३) हे एक मराठी लेखक आहेत. ते विदर्भातील पद्मशाली समाजाचे आहेत. त्यांनी काही थोर पुरुषांची चरित्रे, आणि या शिवाय काही तीर्थक्षेत्रांची ओळख करून देणारी पुस्तकेही लिहिली आहेत. ते एम.एस्‌सी.(इलेक्ट्रॉनिक्स), एल्‌एल.बी. एल्‌एम्‌आय्‌एस्‌टीई आहेत. ते जर्मन भाषा शिकले आहेत. संगणकशास्त्राचे काही अभ्यासक्रमही त्यांनी केले आहेत.

नोकरी

[संपादन]

चंद्रपूरमध्ये ते १९७५-७६ या काळात शाळाशिक्षक होते. १९७६-९५ या काळात सरकारी पॉलिटेक्निकमध्ये इलेकट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या विषयाचे त्यांनी अध्यापन केले. पुढे ते त्या विद्याशाखेचे ते त्याच संस्थेमध्ये प्रमुख झाले. ३० एप्रिल २०१३ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

सामाजिक कार्य आणि लेखन

[संपादन]

सामाजिक कार्याची आवड असल्याने ते अनेक संघटनांचे पदाधिकारी झाले.

प्रा. विजय यंगलवार यांनी इलेक्ट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमावर आधारित इलेक्ट्रॉनिक्स विषयाची २५हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. विविध वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी लेख लिहिले आहेत. तांत्रिक विषयाचे प्राध्यापक असूनही त्यांनी अनेक धार्मिक विषयांवरही लिहिले आहे.

विजय यंगलवार यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • आधुनिक काळातील संतांची मांदियाळी (गजानन महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी, साईबाबा, स्वामी समर्थ आणि दोन संत यांचा परिचय)
  • संत एकनाथ
  • श्री क्षेत्र कन्याकुमारी दर्शन
  • श्री गणेश माहात्म्य
  • गो माहात्म्य सांगणारी गो-सूक्ते
  • देवस्वरूपा कामधेनु (वैज्ञानिक)
  • राष्ट्र नेते नरेंद्र मोदी
  • नागपूर दर्शन
  • देवर्षी नारद
  • पंचगव्य औषधोपचार
  • श्री क्षेत्र पंढरपूर दर्शन
  • पद्मशाली यशोगाथा
  • पंथ प्रदर्शक संत
  • वायुकन्या पी. टी. उषा
  • श्री क्षेत्र पैठण दर्शन
  • भक्तीचा ध्वज उभारणाऱ्या महिला संत : जनाबाई, मुक्ताई, कान्होपात्रा, मीराबाई, बहिणाबाई.
  • वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी
  • भारतीय ऑलिम्पिक वीर
  • भारतीय नोबेल विजेते
  • भारतीय परमवीर
  • भारताची राष्ट्रीय प्रतीके
  • मराठी ज्ञानपीठ विजेते
  • महर्षी भृगू
  • महर्षी अभियंता - मो.(क्षगुंडम) विश्वेश्वरैय्या
  • भक्तीचा ध्वज उभारणाऱ्या महिला संत
  • श्री क्षेत्र मार्कण्डा देव
  • मृत्युंजय मार्कंडेय ऋषी
  • मोक्षप्राप्ती
  • विकासाचा झंझावात (नरेंड्र मोदींवरील पुस्तक)
  • आदि शंकराचार्य श्रीक्षेत्र कालडी दर्शन सह
  • श्री क्षेत्र शेगाव दर्शन
  • शिर्डीचे साईबाबा
  • Basic Electronics for First Year Diploma (लेखक : यंगलवार आणि तीन सहलेखक)