Jump to content

राजेश खन्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजेश खन्ना
राजेश खन्ना
जन्म २९ डिसेंबर, इ.स. १९४२
अमृतसर, पंजाब (भारत)
मृत्यू १८ जुलै, इ.स. २०१२
मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ इ.स. १९६६-इ.स. २०१२
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट आनंद
पत्नी डिंपल कापडिया
अपत्ये ट्विंकल खन्ना, रिंकी खन्ना
अधिकृत संकेतस्थळ

राजेश खन्ना, जन्म नाव जतीन खन्ना, (२९ डिसेंबर, इ.स. १९४२ - १८ जुलै, इ.स. २०१२) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खरें सुपरस्टार म्हणुन ओळखले जाणारे अभिनेते होते. ह्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही काम केले आहे.

काकाने दत्तक घेतल्यानंतर राजेश खन्‍ना मुंबईत आले व शाळेत जाऊ लागले. त्यांनी महाविद्यालयातले स्नेहसंमेलन गाजविले. त्यातून ते चित्रपटाकडे वळले आणि मग हिंदी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार बनले. राजेश खन्ना यांनी एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली होती.

त्यांनी चित्रपटांत रंगविलेले प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरले. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या लोकांना आवडल्या. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते.

"आनंद" व "अमर प्रेम" हे विशेष उल्लेखनीय चित्रपट.

सुपरस्टार राजेश खन्ना म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टितील एक चमत्कार होता.त्यांच्या एवढे अभूतपूर्व यश,लोकप्रियता व झपाटलेला प्रेक्षक वर्ग त्यांच्या आधी व नंतर कुठल्याहि स्टारला मिळालेले नाहि. लोक त्यांच्या पायाची माती कपाळाला लावायचे.व तरुणी स्वतच्या रक्ताने त्याना पत्र लिहायच्या.खन्नाच्या फोटो सोबती असंख्य तरुणींनी लग्न लावले होते.त्यांची कार तरुणींच्या लिपस्टिकच्या खुणांनी भरून जायची.

लोकप्रियतेची एवढी ऊंची आजपर्यंत इतर कुठलाहि स्टार गाठु शकला नाही.

राजेश खन्‍ना यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला परंतु त्याचा परिणाम राजेश खन्‍नां वर झाला नाहि..

राजेश खन्ना यांना मिळालेले सन्मान, पुरस्कार आणि पारितोषिके

[संपादन]
  1. फिल्म फेअर पुरस्कार (१९७१)-उत्कृष्ट अभिनेता
  2. फिल्म फेअर पुरस्कार (१९७२)-उत्कृष्ट अभिनेता
  3. फिल्म फेअर पुरस्कार (१९७५)-उत्कृष्ट अभिनेता
  4. फिल्म फेअर जीवन गौरव पुरस्कार (२००५)
  • राजेश खन्ना यांना फिल्म फेअर पुरस्कारासाठी तब्बल १४ वेळा नामांकित करण्यात आले होते, त्यापैकी तीन वेळा त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला.

प्रमुख चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका विशेष माहिती
१९८३ अगर तुमना होते अशोक मेहरा
१९८६ अंगारें
१९७४ अजनबी रोहित कुमार सक्सेना
१९७१ अंदाज़ राज
१९७२ अनुराग गंगाराम
१९७७ अनुरोध अरुण चौधरी/संजय कुमार
१९८६ अनोखा रिश्ता
१९७२ अपना देश आकाश चंद्र
१९७९ अमर दीप राजा/सोनू
१९७१ अमर प्रेम आनंद बाबू
१९८६ अमृत
१९८५ अलग अलग
१९८३ अवतार अवतार
१९८२ अशान्ति
१९९९ आ अब लौट चलें
१९८५ आखिर क्यों? आलोक नाथ
१९८० ऑंचल
१९८४ आज का एम.एल.ए. राम अवतार
१९७० आनन्द
१९७० आन मिलो सजना अजित
१९७४ आप की कसम
१९६९ आराधना
१९८४ आवाज़
१९८७ आवाम
१९८७ आवारा बाप
१९७३ आविष्कार अमर
१९८४ आशा ज्योति दीपक चन्दर
१९७७ आशिक हूॅं बहारों का अशोक शर्मा
१९८५ ऊॅंचे लोग
१९७० कटी पतंग कमल सिन्हा
१९७७ कर्म अरविंद कुमार
१९८१ कुदरत
२००२ क्या दिल ने कहा
१९८७ गोरा
१९७७ छलिया बाबू
१९७९ जनता हवलदार
१९८५ ज़माना
१९८२ जानवर राजू
१९७२ जोरू का गुलाम राजेश
१९७७ त्याग
१९८० थोड़ी सी बेवफाई अरुण कुमार चौधरी
१९८१ दर्द
१९७३ दाग
१९७२ दिल दौलत दुनिया विजय
१९८५ दुर्गा
१९७१ दुश्मन
१९६९ दो रास्ते
१९८१ धनवान
१९८४ धर्म और कानून
१९८२ धर्म कॉंटा
१९८७ नज़राना
१९७३ नमक हराम
१९८४ नया कदम रामू
१९८५ नया बकरा
१९८६ नसीहत
१९८२ नादान आनंद
१९८५ निशान
१९७८ नौकरी रंजीत गुप्ता 'रोनू'
१९७७ पलकों की छॉंव में
१९८९ पाप का अंत
२००१ प्यार ज़िन्दगी है
१९७५ प्रेम कहानी
१९७४ प्रेम नगर
१९७९ प्रेम बंधन किशन/मोहन खन्ना
१९८० फ़िर वही रात डॉ. विजय
१९८० बंदिश
१९६९ बंधन
१९६७ बहारों के सपने
१९८५ बाबू
१९७२ बावर्ची
१९८५ बेवफ़ाई अशोक नाथ
१९७८ भोला भाला
१९८४ मकसद
१९७६ महबूबा
१९७६ महा चोर
१९७२ मालिक राजू
१९८५ मास्टर जी
१९७९ मुकाबला कव्वाली गायक
१९७२ मेरे जीवन साथी प्रकाश
१९८९ मैं तेरा दुश्मन शंकर
१९८२ राजपूत
१९९१ रुपये दस करोड़
१९७४ रोटी मंगल सिंह
१९८८ विजय
१९७२ शहज़ादा राजेश
१९८६ शत्रु इन्स्पेक्टर अशोक शर्मा
१९७० सच्चा झूठा भोला/रंजित कुमार
१९७० सफ़र अविनाश
१९८२ सुराग पाहुणा कलाकार
१९८३ सौतन
१९९० स्वर्ग
१९८५ हम दोनों
१९७४ हमशक्ल
१९७१ हाथी मेरे साथी राज कुमार

चरित्र

[संपादन]

राजेश खन्‍ना याचे ’एकमेव सुपरस्टार’ नावाचे मराठी चरित्र संजीव पाध्ये यांनी लिहिले आहे.

तो का झाला, त्याचे वागणे-बोलणे, त्याच्या नायिका, त्याचे पत्रकारांशी संबंध, इतर सहकलाकारांचे त्याच्याविषयीचे विचार, अन्य क्षेत्रांतील महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया, हे सर्व संजीव पाध्ये यांच्या 'एकमेव सुपरस्टार'मधून वाचायला मिळते. डिंपल व त्याचा विवाह, नंतरचे सहजीवन व दुरावा, त्याच्या 'आशीर्वाद ' बंगल्याची कहाणी ही सर्व या पुस्तकात आहे.


बाह्य दुवे

[संपादन]