माधव गोळवलकर
Appearance
गोळवलकर गुरूजी | |
---|---|
टोपणनाव: | गोळवलकर गुरूजी, श्रीगुरूजी |
जन्म: | फेब्रुवारी १९, इ.स. १९०६ नागपुर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू: | जून ५, इ.स. १९७३ नागपूर, महाराष्ट्र, भारत |
चळवळ: | हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी |
संघटना: | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | डॉ.केशव बळीराम हेडगेवार
स्वामी विवेकानंद स्वामी अखंडानंद |
वडील: | सदाशिव गोळवलकर |
माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररूपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.
पुरस्कार
[संपादन]राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातील जनकल्याण समितीतर्फे इ.स. १९९७ सालापासून गोळवलकर गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थविविध क्षेत्रातील व्यक्तींना ’परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार’ दिले जातात.
बाह्य दुवे
[संपादन]मागील केशव बळीराम हेडगेवार |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक इ.स. १९४० – इ.स. १९७३ |
पुढील मधुकर दत्तात्रेय देवरस |