बिहारी भाषा
Appearance
बिहारी हे नाव भारत देशाच्या बिहार राज्यातील अनेक भाषांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरले जाते. बिहारीमध्ये प्रामुख्याने मगधी, मैथिली व भोजपुरी ह्या भाषांचा समावेश होतो. ह्या प्रत्येक भाषेच्या अनेक बोलीभाषा असून ह्यांपैकी काही नेपाळ देशामध्ये देखील वापरल्या जातात. बिहारी ही हिंद-आर्य भाषासमूहामधील एक आहे.
ह्या तीन बिहारी भाषांपैकी मैथिली वगळता भोजपुरी व मगधी भाषा बरेचदा चुकीने हिंदीच्याच आवृत्त्या समजल्या जातात.
बाह्य दुवे
[संपादन]- एथ्नॅलॉगवरील माहिती (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)