Jump to content

बाळ पळसुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले (२८ डिसेंबर, इ.स. १९३४ - ३० जुलै, इ.स. २०१२: इचलकरंजी, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत.

जीवन

[संपादन]

भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बॅंडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. नंतर ते चित्रपटांतून छोट्याछोट्या भूमिका करू लागले. त्यानंतर त्यांनी १९६५पासून सांगलीत राहूनच चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. त्यासाठी मुंबईला जाण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. इतके असून बाळ पळसुले यांनी सुमारे १५० ते २०० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे संगीत प्रामुख्याने ग्रामीण बाजाचे असे. मराठीखेरीज काही हिंदी, भोजपुरी आणि गुजराती चित्रपटांचेही ते संगीत दिग्दर्शक होते.

बाळ पळसुले यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेले काही चित्रपट

[संपादन]
  • अशी असावी सासुरवाशीण
  • कळतंय पण वळत नाही
  • कौल दे खंडेराया
  • गाढवाचं लग्न
  • गाव सारा जागा झाला
  • जखमी वाघीण
  • डाळिंबी
  • तेवढं सोडून बोला
  • थापाड्या
  • दगा
  • नटले मी तुमच्यासाठी
  • नवऱ्यानी सोडली
  • निखारे
  • पंढरीची वारी
  • पाटलीण
  • पेटलेली माणसं
  • फटाकडी
  • फुकट चंबू बाबूराव
  • भन्‍नाट भानू
  • भिंगरी
  • मंगळसूत्र
  • मोसंबी नारंगी
  • या टोपीखाली दडलंय काय (२०१२,अखेरचा चित्रपट)
  • रणरागिणी
  • राजा पंढरिचा
  • सुधारलेल्या बायका (१९६५, पहिला चित्रपट)
  • सूनबाई ओटी भरून जा

बाळ पळसुले यांनी संगीत दिलेली आणि गाजलेली काही चित्रपट गीते

[संपादन]
  • अप्सरा स्वर्गातुन आली (पाटलीण)
  • अवती भंवती डोंगरझाडी
  • आभाळाला सपन सखे प्रीतिचं (निखारे)
  • आला आला रे गोविंदा आला (भिंगरी)
  • कदी हिकडं कदी हिकडं (पेटलेली माणसं)
  • कुठं कुठं जायाचं हनिमुनला (फटाकडी)
  • गणरायाला मुजरा (पेटलेली माणसं)
  • गराऽऽ गराऽऽ भिंगरी गं भिगरीऽऽ (भिंगरी)
  • गोऱ्या गोऱ्या टाचंत काटा घुसला (मोसंबी नारंगी)
  • घडली करुण कहाणी (दगा)
  • ज्वानीच्या पाण्यात (करावं तसं भरावं)
  • देवा तुला दया येईना कशी (पाटलीण)
  • देव दिसला गं मला देव दिसला (पाटलीण)
  • धरिला पंढरिचा चोर
  • नार नखऱ्याची मी तरणी (भिंगरी)
  • पांडोबा पोरगी फसली (करावं तसं भरावं)
  • पाव्हणं राहता का (सूनबाई ओटी भरून जा)
  • रानी बोले नलराजाला (कौल दे खंडेराया)
  • लग्नात गोंधळ घालते (भिंगरी)
  • विठ्ठलनामाची शाळा भरली
  • विस्कटलेले कुंकू त्याला रंग नवा आला
  • शिव शंभू (पेटलेली माणसं)
  • सुताला व्हडंल वारा (पाटलीण)
  • सोनं नाणं नगं (सूनबाई ओटी भरून जा)
  • हे शिवशंकर (थापाड्या)

बाळ पळसुले यांची काही गैरफिल्मी गीते आणि काही आल्बम

[संपादन]
  • आलं विझत चांदणं (पहाटेची भूपाळी आणि भक्तिगीते -३)
  • कंबर लचकली (गायिका : आशा भोसले)
  • गणपतीच्या म्होरं नाचू गाऊ या (?)
  • गौरी गीत पूजिते मंगळागौर(स्त्रीगीते)
  • टकमक बघत बसल्या (?)
  • तुझी साथ हवी रे रोज मला (निसर्गराजा-२)
  • पटलं तर व्हंय म्हणा (?)
  • माझी संगत सोबत करा (?)
  • रुबाबात धरली नोट शंभराची (मराठी चित्रपट संगीत -९-लावण्या)
  • सजनी गं भुललो मी (निसर्गराजा-१)
  • स्वप्नाचा भास माझ्या संसाराला झाला (स्वरानंद-स्वप्नरंग)
  • हे गणनायक सिद्धिविनायक (?)
  • हेरला गं हेरला गं (मराठमोळ्या लावण्या)

बाळ पळसुले यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेले गायक/गायिका

[संपादन]
  • अनुप जलोटा
  • अनुराधा पौडवाल
  • आशा भोसले
  • उत्तरा केळकर
  • उदित नारायण
  • उषा मंगेशकर
  • कृष्णा कल्ले
  • नंदेश उमप
  • भीमसेन जोशी
  • महेंद्र कपूर
  • वैशाली सामंत
  • सुदेश भोसले
  • सुधीर फडके
  • सुमन कल्याणपूर
  • सुरेश वाडकर

हे सुद्धा पहा

[संपादन]