प्राकृतिक भूगोल
Appearance
प्राकृतिक भूगोल ही भूगोलशाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचा पुराव्यात्मक अभ्यास करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.
प्राकृतिक भूगोलाची शाखा | करण्यात येणारे अध्ययन |
---|---|
भूरुपशास्त्र (Geomorphology) | पृथ्वीचा पृष्ठभाग |
हवामानशास्त्र ( Climatology) | हवामान |
समुद्रशास्त्र (Oceanography) | सागर आणि उपसागर |
जैवभूगोलशास्त्र | वनस्पती व प्राणी |
मृदाभूगोल | मृदा |
जलावरणशास्त्र (Hydrology) | जलचक्र, पाण्याचे विविध स्रोत |
पर्यावरणीय भूगोल (Environmental geography) | पर्यावरण |