प्रवाह विज्ञान
Appearance
प्रवाह विज्ञान अथवा 'fluid mechanics' हा स्थापत्य अभियांत्रिकी तसेच यांत्रिक व रासायनिक अभियांत्रिकी या विविध शाखांमध्ये अभ्यासला जाणारा महत्त्वाचा विषय आहे. या मध्ये प्रामुख्याने प्रवाहिके (जे पदार्थ वाहू शकतात असे) ज्यामध्ये प्रामुख्याने विश्वातील सर्व द्रव्ये व वायूंचा समावेश होतो. घन पदार्थ वाहू शकत नसल्यामुळे ते या विषयात अपेक्षित नाही परंतु घन पदार्थांचे देखील वहन कशा प्रकारे केले जाईल यावर देखील अभ्यास होतो.