Jump to content

पहिले चीन–जपान युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिले चीन–जपान युद्ध

दिनांक १ ऑगस्ट १८९४ - १७ एप्रिल १८९५
स्थान मांचुरिया, तैवान, कोरियन द्वीपकल्प, पिवळा समुद्र
परिणती जपानचा सपशेल विजय, छिंग राजवंशाची नाचक्की
प्रादेशिक बदल चीनने तैवान, लायोडॉंग द्वीपकल्प इत्यादी भूभाग जपानला दिले
युद्धमान पक्ष
जपान चीन
सेनापती
सम्राट मैजी सम्राट क्वांगशू
सैन्यबळ
२,४०,६१६ ६,३०,०००

पहिले चीन–जपान युद्ध प्रामुख्याने कोरियाच्या अधिपत्यावरून चीनजपान ह्या राष्ट्रांदरम्यान १८९४-९५ साली लढले गेले. सहा महिने चाललेल्या ह्या युद्धात जपानने सातत्याने विजय मिळवले व अखेर फेब्रुवारी १८९५ मध्ये चीनने सपशेल शरणागती पत्कारली. ह्या पराभवामुळे चीनमधील छिंग राजवंशाची जगभर नाचक्की झाली व त्याचवेळी पूर्व आशियामधील प्रादेशिक वरचष्मा प्रथमच चीनकडून जपानकडे आला.

१८६८ सालच्या जपानमधील मैजी पुनर्स्थापनेनंतर जपानची झपाट्याने प्रगती व आधुनिकीकरण होत होते. अनेक शतकांचे एकाकी राहण्याचे धोरण बदलून जपानने जागतिक घडामोडींमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली व त्याचसोबत साम्राज्यवादाचा देखील अंगिकार केला. तुलनेत शेजारील कोरिया देश मागासलेलाच राहिला होता. जपानला कोरियावर दुसऱ्या महासत्तेचे नियंत्रण नको होते व कोरियामधील नैसर्गिक संपत्तीवर व कृषी उत्पन्नावर जपानचा डोळा होता. पारंपारिक काळापासून कोरियामधील चोसून राजवंशावर चीनचा अंमल होता. १८८० च्या दशकामधील कोरियात घडलेल्या अनेक घटनांमुळे चीन व जपानमध्ये तणाव कायम राहिला.

जून १८९४ मध्ये सोलमधील एक बंडखोरी मोडून काढण्यासाठी कोरियन सरकारने चीनची मदत मागितली. चीनने ४,८०० सैनिक कोरियामध्ये धाडल्यामुळे खवळलेल्या जपानने ८,००० बळ असलेली एक सैन्य तुकडी सोलमध्ये धाडली व कोरियन राजाची सत्ता उलथवून लावून जपानी कळसुत्री असलेले सरकार स्थापन केले. नव्या सरकारने कोरिया-चीन दरम्यानचे सर्व करार रद्द केले व जपानला चीनी सैन्याला कोरियामधून हाकलून लावण्याची परवानगी दिली. अखेर २५ जुलै १८९४ रोजी युद्धास सुरुवात झाली. सरस व आधुनिक जपानी पायदळ व आरमारापुढे अविकसित छिंग सेनेचा टिकाव लागला नाही. १७ एप्रिल १८९५ रोजी चीन व जपानदरम्यान तह झाला ज्यामध्ये चीनने कोरियाला संपूर्ण स्वातंत्र्य मंजूर केले व आपला बराचसा भूभाग जपानच्या स्वाधीन केला.

ह्या युद्धानंतर १० वर्षांनी मांचुरिया व लायोडॉंग द्वीपकल्पाच्या अधिपत्यावरून रशिया–जपान युद्ध घडले.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]