Jump to content

दक्षिण व्हियेतनाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिएतनामचे प्रजासत्ताक
Việt Nam Cộng hòa (विएतनाम गोंग-होआ)
इ.स. १९५४इ.स. १९७५
चिन्ह
राजधानी साईगोन
सर्वात मोठे शहर तो क्वॉक - दाहर दू - त्राच नेह्म(१९५४-६७)
(पित्रृप्रदेश-सत्कार-जबाबदारी)
तो क्वॉक - कॉंग मिन्ह - लिएम चिन्ह(१९६७-७५)
(पित्रृप्रदेश-न्याय-एकता)
शासनप्रकार प्रजासत्ताक
राष्ट्रप्रमुख -१९५५-६३ न्गो दिन्ह दिएम
-१९६३-७५ न्गुयेन वान थिउ
अधिकृत भाषा व्हिएतनामी, फ्रेंच
क्षेत्रफळ १,७३,८०९ चौरस किमी
लोकसंख्या १९,५८२,०००
–घनता २९१.८/चौ.किमी. प्रती चौरस किमी

दक्षिण व्हिएतनाम (व्हिएतनामी: Việt Nam Cộng hòa, विएतनाम गोंग-होआ) हा आग्नेय आशियातील वर्तमान व्हिएतनामाच्या दक्षिण भागावर इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. इ.स. १९५० च्या दशकात याला "व्हिएतनामचे राज्य" (इ.स. १९४९-५५) या नावाने आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली; तर पुढे "व्हिएतनामचे प्रजासत्ताक" (इ.स. १९५५-७५) या नावाने यास आंतरराष्ट्रीय मान्यता होती. साईगोन येथे याची राजधानी होती. इ.स. १९५४ च्या जिनिव्हा परिषदेत व्हिएतनामाची साम्यवादी व बिगर-साम्यवादी अशी फाळणी झाल्यावर "दक्षिण व्हिएतनाम" व "उत्तर व्हिएतनाम" अशा संज्ञा रूढ झाल्या. व्हिएतनाम युद्धात दक्षिण व्हिएतनाम अमेरिकेच्या बाजूने सहभागी झाला.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "व्हियेतनामाच्या प्रजासत्ताकाची राज्यघटना (इ.स. १९५६)" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2009-03-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.CS1 maint: unrecognized language (link)
  • "व्हियेतनामाच्या प्रजासत्ताकाची राज्यघटना (इ.स. १९६७)" (व्हियेतनामी भाषेत). 2006-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)