तेजपूर
Appearance
तेजपूर তেজপুৰ |
|
आसाममधील शहर | |
तेजपूर येथील ब्रह्मपुत्रा नदीवरील कोलिया भोमोरा सेतू |
|
देश | भारत |
राज्य | आसाम |
जिल्हा | सोणितपुर जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | १५७ फूट (४८ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ५८,५५९ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
तेजपूर (आसामी: তেজপুৰ) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील सोणितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तेजपूर शहर आसामच्या उत्तर भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून ते आसामचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.
तेजपूर विमानतळ तेजपूर शहरापासून ८ किमी अंतरावर स्थित असून येथून कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रवासी वाहतूकसेवा उपलब्ध आहे.