जोसेफ लुई लाग्रांज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोसेफ लुई लाग्रांज

पूर्ण नावजोसेफ लुई लाग्रांज
जन्म जानेवारी २५, १७३६
तुरिन, इटली
मृत्यू एप्रिल १०, १८१३
पॅरिस, फ्रांस
निवासस्थान इटली
फ्रान्स
प्रशिया
राष्ट्रीयत्व इटालियन
फ्रेंच
धर्म ख्रिश्चन (रोमन कॅथॉलिक)
कार्यक्षेत्र गणित,
गणितीय भौतिकशास्त्र
कार्यसंस्था एकोल पोलिटेश्निक
डॉक्टरेटचे मार्गदर्शक लेओनार्ड ऑयलर
डॉक्टरेटकरता विद्यार्थी जोसेफ फुरिए
ज्योवान्नी प्लाना
सिमेओन प्वासों
ख्याती ऍनालिटिकल मेकॅनिक्स
सेलेस्टियल मेकॅनिक्स
मॅथेमॅटिकल ऍनालिसिस
नंबर थिअरी

जोसेफ लुई लाग्रांज (जानेवारी २५, १७३६:तुरिन, इटली - एप्रिल १०, १८१३:पॅरिस, फ्रांस) हा गणितज्ञ व गणितीय भौतिकशास्त्रज्ञ होता.

याचेच मूळ नाव ज्युसेप्पे लोडोव्हिको लाग्रांजिया असे होते.

अतिशय तल्लख असलेला लाग्रांज वयाच्या विसाव्या वर्षी तुरिनच्या आर्टिलरी स्कूल मध्ये प्राध्यापकपदावर पोचला. लियोनार्ड ऑयलर व ड'अलॅम्बर्टच्या भलावणीवरून त्याला बर्लिनच्या प्रशियन विज्ञान अकादमीचा निदेशक म्हणून नेमण्यात आला. या पदावर वीस वर्षे राहून लाग्रांजने सखोल संशोधन करून ते प्रसिद्ध केले.