Jump to content

ग्रेट ब्रिटनची ॲन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ‍ॅन, ग्रेट ब्रिटनची राणी

कार्यकाळ
८ मार्च १७०२ – १ मे १७०७
मागील विल्यम तिसरा

कार्यकाळ
१ मे १७०७ – १ ऑगस्ट १७१४
पुढील पहिला जॉर्ज

जन्म ६ फेब्रुवारी, १६६५ (1665-02-06)
लंडन
मृत्यू १ ऑगस्ट, १७१४ (वय ४९)
लंडन
सही ग्रेट ब्रिटनची ॲनयांची सही

ॲन (६ फेब्रुवारी १६६५, सेंट जेम्स महाल, वेस्टमिन्स्टर, इंग्लंड - १ ऑगस्ट १७१४, केन्सिंग्टन महाल, मिडलसेक्स, इंग्लंड) ही १७०२ पासून इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होते. १ मे १७०७ रोजी इंग्लंड आणि स्कॉटलंडचे ग्रेट ब्रिटन नावाने एकत्रीकरण झाल्यावर ती मृत्यूपर्यंत ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी होती.

सतरा वेळा गर्भवती राहिलेल्या ॲनचा फक्त एक मुलगा १० वर्षांपेक्षा जास्त जगला व तोही ११व्या वर्षी मृत्यू पावला. निपुत्रिक मृत्यू पावलेली ॲन स्टुअर्ट घराण्याची शेवटची राज्यकर्ती होती. तिच्यानंतर तिचा चुलतमामेभाऊ पहिला जॉर्ज ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा झाला.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: