Jump to content

कुमुरम भीम गिरिजन संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुमुरम भीम गिरिजन संग्रहालय हे संग्रहालय जोडेघाट या गावात आहे. हे गाव तेलंगाना राज्यातील कुमुरम भीम असिफाबाद जिल्ह्यात आहे. हे गाव केरामेरी तालुक्यात येते. हे संग्रहालय असिफाबाद संग्रहालय नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. संग्रहालय असिफाबाद आणि नजीकच्या भागातील आदिवासी संकृतीचा वारसा जपण्यासाठी अतिशय मोलाचे योगदान देत आहे.[][]

हे संग्रहालय आदिवासी संस्कृती आणि त्याच्या वारसाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. याच भूमीवर दिनांक १ सप्टेंबर १९४० रोजी आदिवासी गोंड क्रांतिकारक कुमुरम भीम आणि त्याचे सहकारी यांना जोडेघाट येथे वीरगती आली. जोडेघाट, या घटनेमुळे शौर्य आणि धाडसासाठी नावलौकिकाला आले.

इतिहास

[संपादन]

आदिवासी क्रांतिकारी कुमुरम भीम हे आदिवासींच्या हक्कासाठी लढले. कुमुरम भीम त्यांच्या पाणी(जल), जंगल(वन) आणि जमीन(भूमी) यांवर त्यांच्या विचारांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत.

या संग्रहालयाचे १६ ऑक्टोबर २०१६ रोजी तेलंगाणा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. कल्वाकुंटला चन्द्रशेखर राव यांच्या हस्ते लोकार्पण/उद्घाटन झाले , आदिवासी क्रांतिकारक आणि त्यांच्या शौर्यासाठी आदरभाव व्यक्त करण्यासाठी या संग्रहालायची स्थापना करण्यात आली.[]

कुमुरम भीम हे आदिवासी नेते होते. कुमुरम भीम हे निजामांच्या पोलिसांविरुद्ध मुख्यतः आदिवासी हक्क, न्याय आणि वन-हक्कांसाठी लढले. निजामांच्या पोलिसांसोबत लढण्यासाठी त्यांनी उंच केरामेरी पर्वतरांगाचा प्रदेश निवडला. या डोंगराळ भागात त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निजाम पोलिसांसोबत गनिमीकावा या युद्धनीतीचा वापर करून युद्ध लढले. कुमुरम भीम यांना जल, जंगल आणि जमीन यांच्यावर आदिवासी समाजाचे सार्वभौम एकाधिकार असावे असे जवळच्या आदिवासी लोकांना पटवून दिले. यामुळे आसपासच्या नवीन झालेल्या केरामेरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या १२ नवीन आदिवासी वस्त्यांमध्ये ही बातमी पसरली आणि स्थानिक आदिवासी लोक अस्वस्थ झालेत. निजाम पोलिसांविरुद्ध युद्धाचे रणशिंग फुंकले गेले.

शेवटी १० सप्टेंबर १९४० रोजी क्रांतिकारक कुमुराम भीम यांना पोलिसांनी पकडले. कोमराम भीम आणि सोबतच्या क्रांतिकारकांना या चकमकीत वीरमरण आले. कुमुरम भीम यांच्यासोबत शहीद झालेल्या क्रांतिकारकांची नावे कुमुरम भीमू, एदला कोंदाल, कुमुरम माणकू, सीडाम भीमू, सिडाम राजू, आत्राम भीमू, आत्राम सुंगू, कोवा अरजू, मडावी मोहपती मोकासी, चहकाटी बाडी, कुमुरम रघु, नैताम गंगू, पुरका माणकू आणि आत्राम भीमू होते.

शासकीय हस्तक्षेप

[संपादन]

तेलंगाणा राज्य शासनाने या घटनेचा आढावा घेतला आणि त्याला महत्त्व देत कुमुराम भीम आणि त्यांच्यासोबत असलेल्या क्रांतिकारकांना आदरांजली म्हणून हे संग्रहालय उभारण्यात आले.

या संग्रहालयासाठी तेलंगाणा राज्यशासनाने २५ कोटी रुपयांची निधी बांधकाम आणि विकासासाठी मंजूर केली. हे संग्रहालय असिफाबाद आणि आसपासच्या आदिवासी संस्कृती आणि वारसा यांच्या विकासासाठी बांधले गेले आहे.

संग्रहालयाची दालने/विशेष आकर्षण

[संपादन]

या संग्रहालयात आदिवासी संस्कृतीतील विविध अवशेष संग्रहीत करण्यात आले आहेत. हे अवशेष मुख्यतः गोंड, कोलाम, थोटी/ठोटी, अंध आणि परधान जमातीशी निगडित आहेत. संग्रहालयात आदिवासी समाजातील विविध परंपरा, नृत्यकला, वेशभूषा, सण, आभूषण, हत्यार, लोकजीवन इत्यादींचा समावेश केला आहे. सोबतच आदिवासींच्या देवांची आणि त्यांच्या मंदिरांचे देखावे आणि प्रतिकृती संग्रहालयात आहेत. आदिवासी जीवनातील एक अभूतपूर्व ज्ञानवर्धक ठेवा येथे बघायला मिळेल.

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ link, Get; Facebook; Twitter; Pinterest; Email; Apps, Other. "Jodeghat" (इंग्रजी भाषेत). 2022-07-17 रोजी पाहिले.
  2. ^ Today, Telangana (2020-10-30). "Jodeghat village on development path in Asifabad". Telangana Today (इंग्रजी भाषेत). 2022-07-17 रोजी पाहिले.
  3. ^ Today, Telangana (2021-10-20). "Thousands pay homage to tribal legend Kumram Bheem". Telangana Today (इंग्रजी भाषेत). 2022-07-17 रोजी पाहिले.