अर्बिल
Appearance
अर्बिल ܐܪܒܠܐ ھەولێر أربيل |
|
इराकमधील शहर | |
देश | इराक |
प्रांत | अर्बिल |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,३८० फूट (४२० मी) |
लोकसंख्या (२०१२) | |
- शहर | १०,२५,००० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:०० |
अर्बिल (कुर्दी: Hewlêr; अरबी: أربيل) हे इराक देशाच्या कुर्दिस्तान भागामधील एक प्रमुख शहर तसेच अर्बिल प्रांत आणि इराकी कुर्दिस्तानची राजधानी आहे. एर्बिल इराकच्या उत्तर भागात बगदादच्या ३५० किमी उत्तरेस वसले आहे. इ.स. पूर्व ५००० पासून अस्तित्वात असलेले अर्बिल जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. येथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी अर्बिल एक लोकप्रिय पर्यटनकेंद्र बनले आहे.
अर्बिलच्या मध्यबिंदूवर असलेला अर्बिलचा किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- विकिव्हॉयेज वरील अर्बिल पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत