ॲलिसन हॅनिगन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲलिसन ली हॅनिगन (२४ मार्च, १९७४:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे.

हॅनिगनने बफी द व्हॅम्पायर स्लेयर या दूरचित्रवाणीमालिकेत विलो रोझेनबर्गची तर हाउ आय मेट युअर मदर या मालिकेत लिली आल्ड्रिनची भूमिका केली आहे. हीने अमेरिकन पाय चित्रपटशृंखलेत मिशेल फ्लॅहर्टीची भूमिका केली आहे. याशिवाय हॅनिगनने सुमारे १० चित्रपट आणि २५पेक्षा जास्त दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनय केला आहे.