ॲनालॉग सायन्स फिक्शन अँड फॅक्ट
Jump to navigation
Jump to search
ॲनालॉग सायन्स फिक्शन ॲण्ड फॅक्ट १९३० पासून विविध नावानी प्रकाशित केलेले एक अमेरिकन विज्ञान कल्पित मासिक आहे. अस्टाउन्डिग स्टोरीज ऑफ सुपर-सायन्स या नावाने पहिला अंक जानेवारी १९३० रोजी विल्यम क्लेटन यांनी प्रकाशित केला आणि हॅरी बेट्स द्वारा संपादित केला गेला. क्लेटन १९३३ मध्ये दिवाळखोर बनले आणि मासिक स्ट्रीट ॲंड स्मिथला विकले गेले. नवीन संपादक एफ. ओर्लिन ट्रेमिन् होते, ज्याने विज्ञानिक कल्पनारम्य क्षेत्रात मॅगझीनला अग्रगण्य केले. जॅक विलियमसन यांच्या लिजन ओफ स्पेस आणि जॉन डब्ल्यू. कॅम्पबेल यांच्या "ट्वायलाइट" सारख्या सुप्रसिद्ध कथा प्रकाशित केल्या.