ॲडम स्मिथ
ॲडम स्मिथ (१६ जून, १७२३:करकॅल्डी, फाइफ, स्कॉटलँड - १७ जुलै, १७९०:एडिनबरा, स्कॉटलँड) हे स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. यांना अर्थशास्त्र अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांचा वेल्थ ऑफ नेशन्स (राष्ट्रांची संपत्ती) या १७७६ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यानी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असे सांगितले.औदयोगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाहीतील बाजारपेठेची समीकरणे त्याने या ग्रंथात मांडली. भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यस्थेचा त्याने पुरस्कार केला,