Jump to content

२०१९ श्रीलंका बॉम्बस्फोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


२१ एप्रिल २०१९ रोजी श्रीलंकेत ईस्टरचा सण साजरा होत असताना कोलंबो या राजधानीच्या शहरात एकापाठोपाठ एक असे ८ बॉम्बचे स्फोट झाले. हे स्फोट ३ चर्च ३ हॉटेले व इतर दोन ठिकाणी झाले.सेंट अँटोनी चर्च, सेंट सबॅस्टियन चर्च, जॉयन चर्च ही तीन चर्चेस आणि हॉटेल शांग्री-ला, किंग्जबरी व सिनेमॉन ग्रँड ही तीन पंचतारांकित हॉटेले आहेत. ह्या आठ स्फोटांत सुमारे ३५९ माणसे मेली तर सुमारे ४५० लोक जखमी झाले. मृतांत सुमारे ३५ परदेशी लोकांचा समावेश आहे.

ही स्फोटमालिका सकाळी ८.४५ वाजता (स्थानिक वेळ) सुरू झाली.

दरम्यान, तेथे २१-४-२०१९ रोजी संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला होता. तिसऱ्या दिवासापासून श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली. या स्फोटमालिकेचा संशय सुरुवातीला तौहीद जमात या स्थानिक संघटनेवर होता; त्यानुसार अटकसत्र चालू झाले होते. नंतरच्या काळात आयएसआय या दशहतवादी संघटनेने आपणच स्फोट घडवून आणल्याचे जाहीर केले.