२०१७ मुंबई चेंगराचेंगरी
मुंबईतील चेंगराचेंगरी | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | अपघात, चेंगराचेंगरी | ||
|---|---|---|---|
| ह्याचा भाग | चेंगराचेंगरी | ||
| स्थान | प्रभादेवी रेल्वे स्थानक, मुंबई शहर जिल्हा, कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
| तारीख | सप्टेंबर २९, इ.स. २०१७ | ||
| मृत्युंची संख्या |
| ||
| जखमींची संख्या |
| ||
![]() | |||
| |||
२९ सप्टेंबर, २०१७ रोजी मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकात (पूर्वीचे एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानक) चेंगराचेंगरी झाली. [१] परळ रेल्वे स्थानक आणि प्रभादेवी उपनगरी रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीमध्ये किमान २३ जण ठार, तर ३९ जण जखमी झाले.[२]
घटना
[संपादन]२९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांमध्ये एकाच वेळी चार उपनगरी गाड्या आल्या.[३][४] प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या[५][६] अरुंद पादचारी पुलावर अनेक लोक एकाच वेळी चढले.[७][८] या वेळी पाऊस पडत होता. या सुमारास कोणी तरी व्यक्ती घसरून पडल्यावर ही चेंगराचेंगरी झाली असावी.[९]
पूल पडत आहे अशी अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी अधिक गर्दी करीत पळ काढण्याचा प्रयत्न केला.[१०] एका साक्षीदारानुसार पोलीस आणि आपत्कालीन अधिकाऱ्यांनी लगेच प्रतिसाद न दिल्यामुळे परिस्थिती चिघळली.
या चेंगराचेंगरीत किमान २३ लोक मरण पावले[११] आणि ३९ जण जखमी झाले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक लोकांचे मृत्यू गुदमरून आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे झाला.[१२]
पोलीस तपास
[संपादन]"आम्ही जवळपास निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. या चेंगराचेंगरीचं मुख्य कारण म्हणजे पाऊस आणि अचानक वाढलेली गर्दी आहे. एकाचवेळी चार लोकल स्टेशन परिसरात आल्या. त्या लोकलमधून प्रवासी आल्यामुळे चेंगराचेंगरी झाली." असे दादर पोलिसांनी सांगीतले.[१३] दादर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची (ADR) नोंद झाली आहे.
अपघातांचे बळी
[संपादन]अपघातात मरण पावलेल्या लोकांची यादी[१४]
| नाव | वय | लिंग | निवास |
|---|---|---|---|
| हिलोनी देढिया | २४ | महिला | घाटकोपर |
| रोहित परब | ११ | पुरुष | विक्रोळी |
| ॲलेक्स कॉरिया | ६१ | पुरुष | विरार |
| अंकुश जयस्वाल | ३६ | पुरुष | दादर |
| शुभा शेट्टी | ४५ | महिला | कांजुर मार्ग |
| सुजाता अल्वा | ४५ | महिला | कांजुर मार्ग |
| चांद्रबंग इंगळे | ५० | महिला | कांजुर मार्ग |
| विजय बहादूर | ५० | पुरुष | घणसोली |
| सुरेश जैस्वाल | ५० | पुरुष | अंधेरी |
| ज्योतिबा चव्हाण | २९ | पुरुष | मुंब्रा |
| टेरेसा फर्नांडिस | ३९ | महिला | दादर |
| मुस्तक रियन | ४५ | पुरुष | मुंब्रा |
| मुकेश मिश्रा | २२ | पुरुष | शीव |
| मीना वाल्हेकर | ३५ | महिला | उल्हासनगर |
| शारदा वरपे | २५ | महिला | कल्याण |
| मयुरेश हळदणकर | २० | पुरुष | वरळी |
| प्रियांका पासलकर | २३ | महिला | कुर्ला |
| मसूद शेख | ३५ | पुरुष | गोवंडी |
संदर्भ
[संपादन]- ↑ "22 Dead, Many Injured In Stampede Near Mumbai's Elphinstone Station". NDTV. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ↑ "Elphinstone Road station stampede: 22 dead, 39 hurt; government announces compensation, orders probe - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ↑ "22 Dead, Many Injured In Stampede Near Mumbai's Elphinstone Station". NDTV. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ↑ "Stampede in Mumbai kills at least 22". IN (इंग्लिश भाषेत). 2017-09-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "Stampede at Mumbai Railway Station Kills at Least 22" (इंग्लिश भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "Mumbai stampede kills 23, injures 39 at train station". CNN. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ↑ "Mumbai railway station stampede kills 22". BBC News. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ↑ "Mumbai railway station stampede kills at least 22". The Guardian (इंग्लिश भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "Mumbai stampede: 22 killed, over 39 injured". The Hans India (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "Mumbai station stampede kills at least 22 amid rumour bridge was collapsing". The Telegraph. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ↑ "Elphinstone stampede: death toll climbs to 23". द हिंदू (इंग्लिश भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "Crushed: What happened at Mumbai's Elphinstone Road railway station". द हिंदू (इंग्लिश भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: पोलिसांनी कारण शोधलं, निष्कर्ष काढला!". 2018-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
- ↑ "'Victims of murder, not an accident'". Mumbai Mirror. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
