हॉकबिल कासव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॉकबिल कासव (इंग्लिश:Hawksbill; शास्त्रीय नाव:Eretmochelys imbricata) हा एक उभयचर प्राणी आहे. ह्या कासवाचे नाकाड शिकारी पक्ष्याच्या (Hawk) चोचीप्रमाणे पुढे आलेले असते. त्यावरून त्याला हॉकबिल कासव हे नाव पडले.


  • अधिवास-उष्ण कटिबंध व उपोष्ण कटिबंध हा ह्या कासवाचा प्राकृतिक अधिवास आहे. जगभरातील उष्णकटिबंधातील किनारे व मुख्यतः बेटांवर ही कासवे घरटी करतात.
  • वर्णन- वजन साधारणतः 150 कि.ग्रॅ.एवढे असते.पृष्ठत्वर्म(Carapace)ची लांबी 80 ते100सें.मी.असते. त्याचा आकार अंडाकृती असून पाठीमागील कडा दंतूर असतात. पार्श्वकांच्या चार जोड्या असतात.त्याचा रंग संगमरवरी तपकिरी असतो. कवचावर अंबर व तपकिरी रंगाची ठळक नक्षी असते.अधरत्वर्म (Plastron) पिवळसर पांढऱ्या रंगाचे असते. पक्ष्याच्या चोचीप्रमाणे पुढे आलेले नाकाड.डोक्यावर ललाटपूर्व परिरक्षींच्या दोन जोड्या असतात. पाय वल्ह्यासारखे व पुढील प्रत्येक पायावर दोन नखे असतात.
  • खाद्य- स्पंज,मृदुकाय प्राणी,जेली फिश,सागरी गवत,जलभित्तीपासून खरवडलेले शैवाल इत्यादी.
  • वीणीचा काळ- ह्या कासवांचा वीणीचा काळ पावसाळा असतो.मादी एका हंगामात बारा ते चौदा दिवसाच्या अंतराने तीन ते पाच वेळा अंडी घालते. अंडी दिवसा व रात्री घातली जातात.एका वेळी घातलेल्या अंड्यांची संख्या 120 ते 150 एवढी असते. अंडी उबवण्याचा कालावधी 50 ते 65 दिवस एवढा असतो.
  • सद्यस्थिती- अंड्याचा अन्न म्हणून उपयोग,अंडी घालण्याच्या जागांचा विनाश व वरुथिकांपासून अलंकार तयार करण्यासाठी प्रौढ कासवांची मोठ्या प्रमाणात होणारी हत्या यामुळे ही जात संकटात आह. भारतीय वन्य जीव (संरक्षण कायदा) 1972 मधील अनुसूची-1 अन्वये संरक्षित.