हेनरिक काप्रिलेस रान्दोस्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेनरिक काप्रिलेस रान्दोस्की

हेनरिक काप्रिलेस रान्दोस्की (जन्म ११ जुलै १९७२) हे व्हेनेझुएलाचे राजकारणी आणि वकिल आहेत. २००० ते २००८ च्या दरम्यान काप्रिलेस काराकासमधील बरूता महानगरपालिकेचे महापौर होते. २००८ मध्ये दिओसदादो कबेलो यांचा पराभव करून काप्रिलेस मिरांडा राज्याचे राज्यपाल म्हणून निवडून आले. १०१२ मध्ये अध्यक्षपदाच्या पक्षांतर्गत निवडणूकांमध्ये काप्रिलेस हे सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडून आले आणि विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार झाले. मुळात ज्यू असलेले काप्रिलेस कुटुंब युरोपियन ज्यू हत्याकांडाच्यावेळी व्हेनेझुएलाला स्थलांतरीत झाले. पण हेनरिक हे मात्र ख्रिश्चन (रोमन कॅथलिक) धर्माचे पालन करतात. काप्रिलेस हे मुख्यत्वे विकासनवादी उजव्या विचारसरणीच्या जस्टिस फर्स्ट पार्टीचे नेते आहेत. हुगो चावेझ यांच्या निधनानंतर राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या मध्यवर्ती निवडणूकांमध्ये काप्रिलेस पुन्हा विरोधी पक्षनेते म्हणून निकोलस मदुरो यांच्या विरुद्ध निवडणूकीत उतरले. १४ एप्रिल २०१३ रोजी निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निकालांनुसार काप्रिलेस यांचा निसटता पराभव झाला. काप्रिलेस यांनी निकाल जाहिर झाल्यावर आपल्या समर्थकांना दिलेल्या संदेशामध्ये निवडणूक प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेवर प्रश्ण उठवले तसेच सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.