Jump to content

हिस्पॅनियोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिस्पॅनियोला बेटाबद्दलची माहिती या लेखात आहे. रॉबर्ट लुई स्टीवन्सनच्या ट्रेझर आयलंड कथेतील जहाजासाठी पहा: हिस्पॅनियोला जहाज.
हिस्पॅनियोला बेट

हिस्पॅनियोला हे कॅरिबियन समुद्रातील एक बेट आहे. क्युबाच्या पूर्वेस वसलेले हे बेट अँटिल्स बेटांमधील मधील आकाराने दुसऱया क्रमांकाचे आहे.

क्रिस्टोफर कोलंबसने डिसेंबर ५, १४९२ रोजी पहिल्यांदा या बेटावर पाय ठेवला. त्यावेळी त्याची (व त्याच्या सहकाऱ्यांची) समजूत होती की ते पृथ्वी-प्रदक्षिणा पूर्ण करून भारतात पोहोचले आहेत. १४९३मध्ये कोलंबस पुन्हा येथे आला व त्याने नव्या जगातील पहिले स्पॅनिश राज्य स्थापन केले.

या बेटाच्या पूर्वेकडील एक-तृतियांश भागात हैती हा देश आहे व उरलेल्या दोन-तृतियांश भागात डॉमिनिकन प्रजासत्ताक आहे.

देश लोकसंख्या
(२००२-०७-०१चा अंदाज)
क्षेत्रफळ
(कि.मी.²)
लोकसंख्या घनता
(प्रति कि.मी.²)
राजधानी
हैती ध्वज हैती ७०,६३,७२२ २७,७५० २५५ पोर्ट-औ-प्रिन्स
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक ८७,२१,५९४ ४८,७३० १७९ सांतो दॉमिंगो
एकूण १,५७,८५,३१६ ७६,४८० २०६