हितेन तेजवानी
Appearance
हितेन तेजवानी | |
---|---|
हितेन तेजवानी | |
जन्म |
हितेन तेजवानी ५ मार्च, १९७४ मुंबई, महाराष्ट्र |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | सिंधी, हिंदी, गुजराती |
पत्नी | गौरी प्रधान तेजवानी |
हितेन तेजवानी (सिंधी: ہٹیں تجوانی, इंग्लिश: Hiten Tejwani) (५ मार्च, इ.स. १९७४ - हयात) हा दूरचित्रवाहिनी माध्यमातील भारतीय अभिनेता आहे. "क्यूंकी सास भी कभी बहू थी", "कुटुंब", आणि "पवित्र रिश्ता" या दूरचित्रवाहिनी मालिकांत साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे तो प्रसिद्ध झाला.
वैयक्तिक जीवन
[संपादन]हितेन तेजवानीचा जन्म मुंबईमध्ये सिंधी कुटुंबात झाला. "कुटुंब" आणि "क्यूंकी सास भी कभी बहू थी" मालिकांपासून त्याच्या सोबत काम केलेली अभिनेत्री गौरी प्रधान हिच्यासोबत २९ एप्रिल इ.स. २००४ रोजी हितेन तेजवानी विवाहबद्ध झाला. ११ नोव्हेंबर, इ.स. २००९ रोजी त्यांना मुलगा नेवान आणि मुलगी कात्या अशी जुळी मुले झाली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |