हादगा (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


हादगा या शब्दाचे दोन अर्थ आहेत.

या लेखात महिलांचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हादग्याची माहिती आहे.

हादगा[संपादन]

पावसाळा संपत आलेला असतो, पिके तयार होत आलेली असतात. काही तयार झालेली असतात. शेतकरी खुशीत असतो. या काळात सूर्य हस्त नक्षत्रातून प्रवास करतो. हादगा त्याच्याशी संबंधित आहे. पाऊस परत जायची वेळ आल्याने रिकामे ढग मोठ्याने आवाज करू लागतात. म्हणून त्यास 'हत्तीचा पाऊस' म्हणतात.[१] सूर्याच्या हस्तनक्षत्राच्या १४-१६ दिवसांच्या काळात हा खेळ खेळला जातो.हादगा ही सांकेतिक पूजा असून ,ती हत्ती या मेघाचे प्रतीक असलेल्या चिह्नाभोवती गुंफलेली असावी.महाराष्ट्रात मेघपूजेची परंपरा फार जुनी आहे.हादग्यातील गज हे जलतत्त्वाचे प्रतीक आहे.लक्ष्मी वा गौरी ही धरणीचे प्रतीक असून पावसाशिवाय मातीची कूस उजवत नाही.मेघाला हत्ती कल्पून केलेली ही पूजा पुरुष तत्त्वाची असून भविष्यात फलित होणा-या कुमारिका ही पूजा करतात असे श्री. वाकडे नोंदवितात.त्यांच्यामते हादगा हा सुफलीकरणाचा विधी आहे.[१]

दुर्गा भागवतांच्या मतानुसार हादगा हे एकाच प्रकारची परंपरा दोन वेगवेगळ्या प्रकारे - हत्तीची प्रतिमा काढून किंवा झाडाची फांदी रोवून - दोन वेगव्गेळ्या समुहांकदून साजरी केली जात असेल आणि परंपरा एकाच उद्देशाने असल्यामुळे परंपरांचे काळाच्या ओघात एकत्रीकरण झाले असेल. दुर्गा भागवतांच्या मतानुसारसुद्धा .हादग्यातील हत्ती हे जलतत्त्वाचे प्रतीक म्हणूनच येत असावे आणि झाडाची फांदी मात्र हादग्याचे म्हणजे अगस्त्याचे झाड असू शकेल पण त्याची फांदी मिळाली नाही तर कोणत्याही झाडाची फांदी चालून जाणे चालू झाले असेल. दुर्गा भागवर गजगौरीचे पुराणातील आख्यान ज्यात भीम देवांना पराभूत करून इंद्राचा ऐरावत घेऊन येतो, ही लोक परंपरेला नंतर जोडलेली कृत्रिम पुस्ती असावी असे विश्लेषण करतात. [२]

  1. ^ डॉ. लोहिया शैला, भूमी आणि स्त्री (२००२)
  2. ^ दुर्गा भागवत, लोक आणि साहित्य, १९७५ संदर्भाचा संदर्भ : डॉ सरोजिनी बाबर यांच्या वाङमयाचा अभ्यास (प्रकरण दुसरे पृष्ठ १४७ PDF पृष्ठ ५७ पिएचडी प्रबंध २००८ सोलापूर विद्यापीठ ); अभ्यासक भारती शंकरराव ताकभाते (सौ भारती दिलीपराव रेवडकर) मराठी विभाग प्रमुख, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी shodhganga.inflibnet.ac.in वरील दुव्यावरून दिनांक भाप्रवे १३ सप्टेंबर २०१७ दुपारी १६.०० वाजता जसे मिळवले