Jump to content

हादगा वृक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हादगा (सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा) हा एक वृक्ष आहे.कुळ फॅबेसी याला अगस्ती किंवा अगस्ता या नावानेही ओळखले जाते. या वृक्षाची वाढ झटपट होते. याचे आयुर्मान तीन ते साडेतीन वर्ष इतके असते व उंची जवळपास १५ ते ३० फुटांपर्यंत असते. ही झाडे देवळांजवळ लावली जातात. तसेच शेताच्या बांधावर यांची लागवड केली जाते. या झाडाला पांढरी, पिवळट-पांढरी किंवा लालसर रंगाची फुले येतात. ही फुले देवाला वाहतात. फुलांची भाजी करतात. या झाडाच्या फुलांचा, पानांचा व सालीचा औषधी उपयोग केला जातो. झाडाच्या पानांचा जनावरांना चारा म्हणून, तर झाडाचे लाकूड शेतीची अवजारे तयार करण्यासाठी उपयोगास येते. आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठीही यांचा उपयोग होतो. हादग्याच्या पानाची व फुलाची भाजी करतात. हादग्याची फुले पांढऱ्या रंगाची असतात.ही वनस्पती प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये विपुल प्रमाणात आढळून येते. हे झाड मध्यम उंचीचे असते.

भारतीय जीवनपद्धतीत

[संपादन]

झाडांची पूजा करण्याची प्रथा प्राचीन कालापासून भारतात आहे.हादगा हे झाड कोकणात फार उपयोगी मानले जाते.पावसाळ्यात त्याला बहर येतो.या फुलांची भाजी व पिठात फुले घालून भाकरीही करतात.कोवळ्या शेंगांची भाजीही करतात.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/93093e92892d93e91c940/93993e92691793e