Jump to content

हातिम (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हातिम
दूरचित्रवाहिनी स्टार प्लस
भाषा हिंदी
प्रकार दूरचित्रवाणी मालिका
देश भारत
निर्माता ज्योती सागर
दिग्दर्शक * अमृत सागर
  • शक्ती सागर
निर्मिती संस्था सागर फिल्म्स
लेखक दिपाली झुंझप्पा
प्रसारण माहिती
चित्रप्रकार SDTV
पहिला भाग 26 December 2003
अंतिम भाग 12 November 2004
एकूण भाग ४७
वर्ष संख्या

हातिम ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे, जी २६ डिसेंबर २००३ ते १२ नोव्हेंबर २००४ पर्यंत स्टार प्लसवर प्रसारित झाली होती. या मालिकेत कल्पनारम्य, नाटक आणि इतर अनेक शैलींचे घटक असून याचे दिग्दर्शन मालिका अमृत सागर यांनी केले होते. पूर्व इस्लामिक काळातील अरेबियन राजकुमार आणि कवी असलेल्या हातिम अल-ताईच्या मूळ कथेवर आधारित ही मालिका आहे.[]

ही मालिका स्टार प्लस, डिझ्नी चॅनल इंडिया, स्टार उत्सव आणि हंगामा टीव्ही यांसारख्या विविध भारतीय चॅनेलवर दाखवली गेली आहे. मावीरन हातिम या नावाने स्टार विजय वाहिनीसाठी ही मालिका तमिळ भाषेतही प्रसारित करण्यात आली.[]

मध्ययुगात, यमनच्या सम्राटाचा नवजात मुलगा हातिम हा शांतता आणि चांगुलपणाचा संदेश पसरवेल, अशी भविष्यवाणी होते. त्याच वेळी जाफर राज्याच्या सम्राटाचा मुलगा जन्माला येतो आणि राजवाड्यातील नजुमी या बाळाला दुष्ट आत्म्यांचा सेवक बनवण्यासाठी काळी जादू करतो.

आपल्या नवजात मुलाला मारले तर जगासाठी चांगले होईल असा निर्णय जाफरचा बादशहा घेतो आणि बाळाचे हृदय जाळण्याचा आदेश देतो. परंतु नजुमी त्याऐवजी एका सशाचे हृदय जाळतो व सम्राटाला दाखवतो, ज्यामुळे सम्राटाला विश्वास बसतो की त्याच्या आदेशाचे पालन झाले आहे. नजुमी मुलाला घेतो आणि त्याचे नाव दज्जाल असे ठेवतो. नंतर तो त्याला काळी जादू शिकवतो.

यानंतर वीस वर्षे निघून जातात. यमनमध्ये, हातिम एक दयाळू आणि सगळ्यांचा आवडता राजकुमार बनतो. तर तिकडे जाफरमध्ये दज्जाल त्याच्या पालकांची हत्या करून सम्राट बनतो. दज्जाल राजवाड्याच्या मनोऱ्याच्या शीर्षस्थानी एक चिरंतन आग बनवतो, ज्यातून त्याला काळी शक्ती मिळते. नजुमी दज्जालला सांगतो की, जर दज्जालने चांगुलपणाच्या शक्तींवर कब्जा केला तर तो जगाचा सर्वोच्च शक्तिशाली होईल. त्यासाठी त्याला दुर्गापूरची राजकन्या सुनैना हिच्याशी लग्न करावे लागेल, जी चांगुलपणाची मूर्ती होती.

सुनैनाचा हात लग्नासाठी मागण्यास दज्जाल दुर्गापूरला येतो, पण ती नकार देते. जेव्हा दज्जाल सुनैनाचा किशोरवयीन भाऊ सूरजला धमकावतो तेव्हा सूरज आपल्या तलवारीने दज्जलचा हात कापतो. परंतु काळ्या जादूने दज्जालचा हात लगेच बरा होतो. त्यानंतर दज्जाल सूरजला दगडाच्या पुतळ्यात रूपांतरित करतो. दज्जाल सुनैनाला सांगतो की, जर तिने लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला तरच तो सूरजला परत मनुष्य बनवेल. तो सुनैनाला प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सात महिने देतो. त्यानंतर त्याचा शाप कायमचा होईल आणि सूरज कधीच जिवंत होणार नाही.

तिकडे येमेनमध्ये हातिमचा विवाह परिस्तानची राजकुमारी जास्मिनशी निश्चित होतो. हातिम आणि जास्मिन पहिल्यांदा भेटतात आणि प्रेमात पडतात. सुनेनाचा प्रियकर आणि जनकपूरचा राजकुमार विशाल हा भिकाऱ्याच्या वेशात हातिमकडे येतो. विशाल हातिमला दज्जालशी लढायला त्याची मदत करण्याची विनंती करतो. येमेनचा सम्राट, हातीम, परिस्तानचा सम्राट आणि विशाल यांची भेट होते. परिस्तानचा सम्राट सांगतो की, जेव्हा चांगुलपणाच्या शक्तींनी परिस्तानची निर्मिती केली तेव्हा एक भविष्यवाणी झाली होती की, एक काळी जादू या जगावर राज्य करेल.परंतु जर चांगल्या देवदूताने हस्तक्षेप केला तर असे टाळता येण्यासारखे होते.

हातिमला दूरच्या प्रदेशात जावे लागणार होते आणि दज्जालची काळी शक्ती नष्ट करण्यासाठी सात प्रश्न सोडवावे लागतील. सम्राट हातिमला ज्वेस्ट्रॉन्गिल नावाची जादुई तलवार देतो. जास्मिन हातिमला होबो नावाच्या एल्फला अंगरक्षक म्हणून हातिमसोबत पाठवते. होबो तिचा बालपणीचा मित्र आणि परिस्तानचा सेवक असतो. हातीम प्रश्नांची उत्तरे शोधत असताना, दज्जालची काळी शक्ती आणि जादुई मनोरे हळूहळू नष्ट होतात. तथापि हातिमने सहाव्या प्रश्नाचे उत्तर शोधल्यानंतर सातवा प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसा वेळ उरत नाही.

यमन, परिस्तान, दुर्गापूर आणि जनकपूरचे सैन्य अंतिम लढाईसाठी जाफर राज्यात येते. त्यांची सेना दज्जालच्या झोम्बी सैन्याविरुद्ध लढत असताना हातीम किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आणि दज्जालशी लढतो. ते दोघे एकाच वेळी मरतात, पण हातिम सातव्या प्रश्नाचे उत्तर मिळवून मृत्यूला हरवतो.

भूमिका

[संपादन]
  • हातिम, यमनचा राजकुमार म्हणून- राहिल आझम
  • होबोच्या भूमिकेत- किकू शारदा
  • परिस्तानची राजकुमारी जास्मिनच्या भूमिकेत- पूजा घई रावल
  • जाफरचा राजा दज्जलच्या भूमिकेत- निर्मल पांडे
  • नजुमीच्या भूमिकेत- विजय गंजू
  • धाकटा हातीम म्हणून- यशवंत महिलवार
  • राजकुमारी सुनयना, दुर्गापूरची राजकुमारी म्हणून- अदिती प्रताप
  • जनकपूरचा राजकुमार विशालच्या भूमिकेत- रोमित राज
  • लहान चमेलीच्या भूमिकेत- झनक शुक्ला
  • यमनचा राजा, हातिमचे वडील म्हणून- रवी खानविलकर
  • द क्वीन ऑफ येमेन, हातिमची आई म्हणून- नेहा बाम
  • पारिस्तानची राणी म्हणून- रेश्मा
  • परिस्तानचा राजा म्हणून- टॉम ऑल्टर
  • झालिमाच्या भूमिकेत- जया भट्टाचार्य
  • बत्तीलाच्या भूमिकेत- रुशाली अरोरा
  • राजकुमारी नादिराच्या भूमिकेत- उषा बचानी
  • लाल केसांची राणी म्हणून- अनिशा हिंदुजा
  • अझलफच्या भूमिकेत- कुमार हेगडे
  • रुबीनाच्या भूमिकेत- किश्वर मर्चंट
  • मल्लिका-ए-हयातच्या भूमिकेत- मानसी वर्मा
  • पाशा म्हणुन- तेज सप्रु
  • अर्गोईसच्या भूमिकेत- कवी कुमार आझाद
  • शकिलाच्या भूमिकेत- शिल्पा शिंदे
  • मायाची जुळी बहीण छायाच्या भूमिकेत- आम्रपाली गुप्ता
  • ऐश्वर्याची (मल्लिका-ए-हुस्न) बहीण म्हणून- शितल ठक्कर माया
  • तरुण होबोच्या भूमिकेत- अंकित शहा
  • अनंतच्या भूमिकेत- विनोद कपूर
  • हकीबोच्या भूमिकेत- अन्वर फतेहान
  • तीस्ताच्या भूमिकेत- रजिता कोचर
  • बटलरच्या भूमिकेत- अखिल मिश्रा
  • उल्टा म्हणून- देवेंद्र चौधरी
  • सुरुषच्या भूमिकेत- जय सोनी
  • कागा म्हणून- राम आवना
  • जान-ए-जहाँच्या भूमिकेत- काम्या पंजाबी
  • शैतान कहरमानच्या भूमिकेत- निमाई बाली
  • राजा आशकानच्या भूमिकेत- गिरीश सहदेव
  • बेजवालच्या भूमिकेत- मुकुल नाग
  • अकलचंदच्या राज्याचे महान वजीर म्हणून- इक्बाल आझाद
  • ड्रॅक्युलाच्या भूमिकेत- हॅरी जोश
  • कतीब-ए-तकदीरच्या भूमिकेत- सुनील चौहान

पुरस्कार

[संपादन]

२००४ मध्ये

[संपादन]
इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार[]
  • सर्वोत्कृष्ट पोशाख - निखत मरियम नीरुषा
  • सर्वोत्कृष्ट संपादन - पपू त्रिवेदी
  • सर्वोत्कृष्ट मेकअप - सागर एंटरटेनमेंट गाथा
  • बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ज्योती सागर
  • सर्वोत्कृष्ट पौराणिक/ऐतिहासिक मालिका - ज्योती सागर अमृत सागर
  • सर्वोत्कृष्ट पॅकेजिंग - अमृत सागर

२००५ मध्ये

[संपादन]
  • सर्वोत्कृष्ट मुलांचा कार्यक्रम ज्योती सागर अमृत सागर
  • सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन - मुकेश कलोला
  • सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी - सागर एंटरटेनमेंट
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा - निखत मरियम
  • सर्वोत्कृष्ट मेकअप - हरी नवर
  • बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ज्योती सागर

प्रसारण

[संपादन]

ही मालिका स्टार प्लस, डिझ्नी चॅनल इंडिया, स्टार उत्सव आणि हंगामा टीव्ही यांसारख्या विविध भारतीय वाहिन्यांवर सिंडिकेट केली गेली आहे. [] मावीरन हातिम नावाच्या स्टार विजय वाहिनीसाठी ही मालिका तमिळ भाषेतही डब करण्यात आली आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ ""The fate of a program is governed by the channel it is telecasted on": Sagar Arts' Amrit Sagar". Indian Television dot com.
  2. ^ Hazarika, Gautamee; Hazarika, Gautamee (2021-12-05). "Hatim, a low-budget epic about an Arabian prince, gripped Indian viewers in the early 2000s". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2022-08-08 रोजी पाहिले.
  3. ^ "GR8! TV Magazine - THE INDIAN TELEVISION ACADEMY AWARDS, 2004". gr8mag.com. 2021-09-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Kids Channel gains viewership". June 9, 2009. July 22, 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "Vijay TV scripts a turnaround tale". 30 April 2005. 24 April 2018 रोजी पाहिले.