हळेबीडु
Jump to navigation
Jump to search
?हळेबीडु कर्नाटक • भारत | |
— गाव — | |
[[चित्र:Halebeedu temple .jpg|235px|none|होयसाळेश्वर मंदिर]] | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | हासन |
लोकसंख्या | ८,९६२ (२००१) |
कोड • दूरध्वनी |
• +०८१७२ |
[[वर्ग:कर्नाटक राज्यातील शहरे व गावे]]
होयसाळ हे देवगीरीच्या यादव वंशातील होते. हळेबीडु किंवा हळेबीड हे कर्नाटक राज्यातील हासन जिल्ह्यातल्या बेलूर तालुक्यातील एक गाव आहे. हे हळेबीडु इ.स. बाराव्या शतकातील होयसाळ साम्राज्याची राजधानी होती. या गावात होयसाळ शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली श्री होयसाळेश्वर आणि श्री केदारेश्वर मंदिरे आहेत. याचे पूर्वीचे नाव द्वारसमुद्र असे होते. अल्लाउद्दीन खिलजीचा सेनानी मलिक काफुर याने हे गाव दोन वेळा उध्वस्त केले, म्हणून याला तुटलेले-फुटलेले गाव म्हणजेच कन्नड भाषेत हळेबीडु असे म्हटले जाते.
इतिहास[संपादन]
हळेबीडु ही इ.स. १२ व १३ व्या शतकात होयसाळ साम्राज्याची राजधानी होती. येथे श्री होयसाळेश्वर, श्री केदारेश्वर, श्री शांतालेश्वर व दिगंबर जैन मंदिरे तेथील शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत. इ.स. १४ व्या शतकात मलिक काफुरने हे नगर उद्धस्त केले.