हरीप्रिया एक्सप्रेस
Appearance

१६५८९/१६५९० हरीप्रिया एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते तिरुपतीच्या तिरुपती रेल्वे स्थानक ह्या स्थानकांदरम्यान धावते. कोल्हापूर ते तिरुपतीदरम्यानचे ९३० किमी अंतर ही गाडी १९ तास व ३५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.
वेळापत्रक
[संपादन]- १७४१५ हरीप्रिया एक्सप्रेस तिरुपतीहून रात्री २१:०० वाजता निघते व कोल्हापूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १६:३५ वाजता पोचते.
- १७४१६ हरीप्रिया एक्सप्रेस कोल्हापूरहून दुपारी १११:३५ वाजता निघते व तिरुपतीला दुसऱ्या दिवशी सकाळी ८:५० वाजता पोचते.
प्रमुख स्थानके
[संपादन]- छत्रपती शाहू महाराज टर्मिनस
- मिरज
- बेळगाव
- धारवाड
- हुबळी
- गदग
- कोप्पळ
- होस्पेट
- बेल्लारी
- गुंटकल
- गूटी
- कडप्पा
- रेनिगुंटा
- तिरुपती