Jump to content

हरिकेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरिकेन 
rapidly rotating storm system that forms in the tropics
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • type of cyclone
उपवर्ग
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q8092
जीएनडी ओळखण: 4186319-7
एलसीसीएन ओळखण: sh85138066
एनडीएल ओळखण: 00575300
BNCF Thesaurus ID: 77209
एनकेसी ओळखण: ph820588, ph820587
U.S. National Archives Identifier: 10638964
BabelNet ID: 00045282n
J9U ID: 987007553672405171
विकिडाटावर माहिती संपादित करा
इसाबेल चक्रीवादळ (२००३), आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशनच्या अभियान ७ मधून दिसलेला वादळाचा डोळा, आयवाॅल आणि आसपासच्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची विशेषतः रेन बॅन्ड्स स्पष्ट दिसत आहेत.

समुद्रावर निर्माण होऊन जमिनीकडे धावणाऱ्या चक्री वादळांना हिंदी महासागरात सायक्लोन, वायव्य पॅसिफिकमध्ये टायफून आणि ईशान्य पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरांत हरिकेन म्हणतात. हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ तीव्र कमी दाबाचे केंद्र (डोळा) आणि त्याच्याभोवती वेगाने फिरणारी हवा यांच्या संगमातून तयार होते. ही चक्री वादळे जेव्हा जमिनीवर पॊचतात तेव्हा प्रचंड वेगाचे वारे वाहतात आणि बहुधा खूप पाऊस पडतो. ही वादळे नॉर'ईस्टर, युरोपियन विंडस्टोन आणि ध्रुवीय अपभार(?)) यांच्या तुलनेत वेगळ्या औष्णिक प्रणालीद्वारे तयार होतात.[ संदर्भ हवा ]

ऑस्ट्रेलियातील धुळीच्या वादळाला विली-विली म्हणतात.

पश्चिम बंगाल आणि बांगला देशांत होणाऱ्या स्थानिक गडगडाटी वादळांना कालबैसाखी (Nor'westers) म्हणतात. आसामात या वादळांना बोर्डोसिला (Bordoisila) म्हणतात. ही वादळे विशेषतः वैशाख महिन्यात होतात.

महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मेघगर्जनेसहित होणाऱ्या पावसाला हत्तीचा पाऊस म्हणतात. २७ सप्तेंबर ते ९ ऑक्टोबर या काळात सूर्य हस्त नक्षत्रात असतो, म्हणून हे नाव. पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस, पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला म्हातारा पाऊस, आश्लेषा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला आसळकाचा पाऊस, मघा नक्षत्रातील कडाडत पडणाऱ्या जोरदार पावसाला सासूचा पाऊस, १५ मे ते ८ जून या काळात पडणाऱ्या गडगडाटी पावसाला मृगाचा पाऊस अशीही नावे आहेत. (सूर्य ८ जून ते २१ जून या काळात मृग नक्षत्रात असतो.)

हरिकेन कंदील

[संपादन]

केरोसीनवर चालणाऱ्या वाऱ्याने विझू शकणाऱ्या घरगुती वापराच्या कंदिलाला हरिकेन लँटर्न म्हणतात.