हरादा नाओमासा
Appearance
हरादा नाओमासा (जपानी: 原田 直政 ; रोमन लिपी: Harada Naomasa ;) (जन्मदिनांक अज्ञात - मे ३०, इ.स. १५७६) हा जपानमधील ओदा कुळातील सामुराई होता. ओदा नोबुनागा याच्या खास, निवडक लढवय्यांच्या सैन्यातून त्याने सैनिकी कारकीर्द आरंभली. इ.स. १५६८ साली नोबुनाग्याने क्योतो जिंकल्यावर तेथे नव्या राजवटीची घडी बसवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. इ.स. १५७४ साली तो यामाशिरो प्रांताचा व यामातो प्रांताचा शासक बनला. इशियामा होगान्-जी किल्ल्यात एकवटलेल्या बंडखोरांचा बिमोड करायला उघडलेल्या मोहिमेतील एका लढाईत इ.स. १५७६ सालातल्या मे महिन्यात तो मारला गेला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |