हरकिसन मेहता
Appearance
हरकिसन लालदास मेहता (२५ मे, १९२८:महुवा, भावनगर जिल्हा, गुजरात - ३ एप्रिल, १९९८:मुंबई, महाराष्ट्र) हे गुजराती लेखक आणि संपादक होते. हे चित्रलेखा या साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी आपल्या अनेक कादंबऱ्या चित्रलेखामध्ये प्रसिद्ध केल्या.
त्यांनी जड चेतन, अंत आरंभ, पाप पश्चात्ताप, प्रवाह पलटायो, चंबल तारो अजंपो सह अनेक कादंबऱ्या तसेच स्वीडन सोनानुं पिंजर हे प्रवासवर्णन लिहिले आहे.