हरकिशनलाल भगत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरकिशनलाल भगत (एप्रिल ४, १९२१- ऑक्टोबर २९, २००५) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते १९७१, १९८०, १९८४ आणि १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. ते राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात संसदीय कामकाजमंत्री होते.