Jump to content

हमीद करझाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हमीद करझई या पानावरून पुनर्निर्देशित)
हमीद करझाई

कार्यकाळ
२२ डिसेंबर २००१ – २९ सप्टेंबर २०१४
उपराष्ट्रपती अहमद झिया महसुद, मोहम्मद फहिम
मागील बुरहानुद्दीन रब्बानी
पुढील अश्रफ घनी

जन्म २४ डिसेंबर १९५७
कंदाहार, अफगाणिस्तान
राजकीय पक्ष अपक्ष
पत्नी झिनत कुरेशी
गुरुकुल हिमाचल प्रदेश विद्यापीठ
धर्म सुन्नी इस्लाम

हमीद करझाई (पश्तो: حامد کرزی‎; फारसी: حامد کرزی‎; जन्म: २४ डिसेंबर इ.स. १९५७) हे अफगाणिस्तान देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष होते.

भारताच्या हिमाचल प्रदेशामध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर करझाईंनी अफगाणिस्तानमधील सोव्हिएत युद्धात मुजाहिदीन बनून अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीला मदत केली. करझाई व त्यांचे कुटुंबीय अफगाणिस्तानचे शेवटचे राजा मोहम्मद झहीर शहा ह्याचे कट्टर पाठीराखे होते. १९९६ साली अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे प्रशासन सत्तेवर आल्यानंतर करझाईंने पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात स्थानांतर केले व तालिबान विरोधी चळवळीमध्ये जगातील महासत्तांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. २००१ मधील तालिबानच्या पाडावानंतर करझाई अफगाणिस्तानचे कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष बनले. २००४ व २००९ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजय मिळवून करझाई सत्तेवर राहिले. ते राष्ट्राध्यक्षपदावर सप्टेंबर २०१४ पर्यंत होते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: