Jump to content

मोहम्मद झहीर शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोहम्मद झहीर शहा या पानावरून पुनर्निर्देशित)
१९३० च्या दशकातील सैनिकी पोशाखात झहीर शाह

मोहम्मद झहीर शाह (पश्तो:محمد ظاهرشاه ;उर्दू:محمد ظاهر شاه; १५ ऑक्टोबर, इ.स. १९१४ - २३ जुलै, २००७) हा अफगाणिस्तानचा शेवटचा राजा होता. हा १९३३ ते १९७३पर्यंत सत्तेवर होता. त्याला अफगाणिस्ताना राष्ट्रपिता असा खिताब देण्यात आला होता.[]

कौटुंबिक माहिती आणि बालपण

[संपादन]

झहीर शाह मोहम्मद नादिर शाहचा मुलगा होता. नादिर शाह तत्कालीन राजा अमानुल्ला खानच्या सैन्याचा मुख्य सेनापती होता. १० ऑक्टोबर, इ.स. १९२९ रोजी नादिर शाह स्वतः अफगाणिस्तानचा राजा झाला.[] व झहीर शाहला युवराजपद दिले गेले.

राज्यकाल

[संपादन]

नादिरशाहची हत्या झाल्यावर झहीर शाह ८ नोव्हेंबर, इ.स. १९३३ रोजी राजा झाला. त्याच्या राज्यकालाची पहिली तीस वर्षे त्याचे दोन काका मोहम्मद हाशिम खान आणि शाह महमूद खान यांनीच सत्ता चालवली.[] या काळात अफगाणिस्तानने इतर देशांशी संबंध प्रस्थापित केले. १९३४ साली अफगाणिस्तान लीग ऑफ नेशन्सचा सदस्य झाला.[] त्यानंतर काही वर्षांत जर्मनी, इटली, जपानसह अनेक देशांशी व्यापारसंबंधही स्थापले गेले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, "Mohammad Zahir Shah"
  2. ^ Encyclopædia Britannica, "Afghanistan Mohammad Nader Shah (1929–33)"
  3. ^ चेस्टरमन, सायमन; Michael Ignatieff; Ramesh Chandra Thakur. Making States Work: State Failure And The Crisis Of Governance. p. 400.
  4. ^ Jentleson, Bruce W.; Paterson, Thomas G. (1997). The American Journal of International Law: 24. Missing or empty |title= (सहाय्य)