Jump to content

स्वादुपिंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अग्न्याशयाची आकृती (मजकूर: इंग्लिश)

स्वादुपिंड किंवा अग्न्याशय (स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश: Pancreas ; जर्मन: Pankreas) हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील एक अवयव आहे. स्वादुपिंड ही एक संयुक्त ग्रंथी असून यातून पाचक विकरांचा विसर्ग होतो, तसेच इन्शुलिन, ग्लुकागॉन, VIP, सोमॅटोस्टॅटिन इत्यादी संप्रेरके स्रवतात. हे स्राव कर्बोदकांच्या (शर्करा) चयापचयामध्ये अत्यावश्यक असतात.

परिचय

[संपादन]

मानवाचे स्वादुपिंड अंदाजे ८० ग्रॅम (म्हणजे साधारण ३ औंस) वजनाचे आणि नाशपातीच्या आकाराचे असते. ते पोटाच्या वरच्या भागात स्थित असून त्याचा वरचा भाग ग्रहणीला (लहान आतड्याचा वरचा भाग) चिकटलेला असतो आणि मधला व खालचा भाग जवळपास प्लीहेपर्यंत विस्तारलेला असतो.

प्रौढांमध्ये स्वादुपिंडाचे कार्य मुख्यत्वे स्वादुनलिकेतून ग्रहणीमध्ये विकरे स्रवणे एवढेच असते. स्वादुपिंडाच्या द्राक्षासारख्या दिसणाऱ्या पेशीपुंजांत स्वादुरस नावाचा पाचक रस निर्माण होतो. या पेशींना स्वादुपेशी असे संबोधले जाते.

स्वादुपिंड (Pancreas) शरीरातील मिश्रित ग्रंथी असून ती पोटामध्ये वरच्या भागात डाव्या बाजूला जठरच्या पाठीमागे असते. स्वादुपिंडाचे हेड, नेक, बॉडी व टेल असे असे चार भागात विभाजन केले जाते. तसेच, पॅनक्रियाटीक duct द्वारे डीओडेनम या छोट्या आतडयाला जोडलेले असते. त्याद्वारे अन्नपचनासाठी आवश्यक विकरे स्वादुपिंडामध्ये बनवून पाठवली जातात. स्वादुपिंडाचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे इन्सुलिन, ग्लुकागॉन, सोमॅटोस्टॅटिन इत्यादी संप्रेरके बनवली जातात व त्याद्वारे मुख्यतः साखरेचे प्रमाण नियंत्रित केले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]