स्वातिलेखा सेनगुप्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वातिलेखा सेनगुप्ता
जन्म २२ मे १९५० (1950-05-22)

स्वातिलेखा सेनगुप्ता (२२ मे १९५० ते १६ जून २०२१) ही एक बंगाली अभिनेत्री होती.[१] एक अभिनेत्री म्हणून भारतीय रंगभूमीवरील योगदानाबद्दल तिला संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता.

कारकिर्द[संपादन]

स्वातिलेखाने १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस अलाहाबादमधील थिएटरमध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. एसी बॅनर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली निर्मितीमध्ये अभिनय केला. तिला बी.व्ही. कारंथ, तपस सेन आणि खालेद चौधरी यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यानंतर ती कोलकाता येथे राहायला गेली. स.न. १९७८ मध्ये नांदीकर थिएटर ग्रुपमध्ये सामील झाली. नंदीकरमध्ये तिने रुद्रप्रसाद सेनगुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले. नंतर त्यांच्याशी तिने लग्न केले. [२][३]

व्हिक्टर बॅनर्जी आणि सौमित्र चॅटर्जी यांच्या विरुद्ध सत्यजित रे यांच्या १९८५ मध्ये आलेल्या घरे बैरे या चित्रपटातही तीने मुख्य स्त्री पात्र वठवले होते. हा चित्रपट प्रसिद्ध बंगाली लेखक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या घरे बैरे याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता. तिने चौरंगा, बेला शेषे, धर्मयुद्ध आणि बेला शुरू या चित्रपटांमध्येही काम केले आहे .[४]

मृत्यू[संपादन]

स्वातिलेखा सेनगुप्ता हिचे १६ जून २०२१ रोजी मूत्रपिंडाच्या आजारांमुळे उद्भवलेल्या गुंतागुंतांमुळे निधन झाले.  मृत्यूसमयी ती ७१ वर्षांची होती. तिचे शेवटचे काम बेलाशुरू होते. 

फिल्मोग्राफी[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका दिग्दर्शक
२०२१ धर्मयुद्ध अम्मी राज चक्रवर्ती
२०२१ बेलाशुरू आरती सरकार नंदिता रॉय ,शिबोप्रसाद मुखर्जी
२०१९ बरोफ सुभमची आई सुदीप चक्रवर्ती
२०१५ बेला शेषे आरती मजुमदार नंदिता रॉय ,शिबोप्रसाद मुखर्जी
१९८५ घरे बायरे बिमला सत्यजित रे

पुरस्कार[संपादन]

  • २०११ - एक अभिनेता म्हणून भारतीय रंगभूमीवरील तिच्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार.[५]
  • पश्चिम बंगाल चित्रपट पत्रकार संघ पुरस्कार .
  • पश्चिम बंग नाट्य अकादमी पुरस्कार.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "My mom and me". India Today. 27 February 2009. Archived from the original on 2015-10-06. 25 June 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Swatilekha Sengupta Akademi Award: Acting". sangeetnatak.org. 10 March 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Basu, Shrabanti. "Sohini Sengupta on theatre, Nandikar and more-Interview". CalcuttaTube. 25 June 2012 रोजी पाहिले.
  4. ^ Sen, Zinia. "I wanted to kill myself after Ghare Baire: Swatilekha Sengupta". 13 February 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Nandikar people". Nandikar. Archived from the original on 10 March 2012. 10 March 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]