स्पायडर मॅन (पवित्र प्रभाकर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकी कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारा स्पायडर-मॅन ( पवित्र प्रभाकर ) हा एक सुपरहिरो आहे. तो भारतात राहणाऱ्या स्पायडर-मॅनचे पर्यायी रूप आहे.

स्पायडर-मॅन: अ‍ॅक्रॉस द स्पायडर-व्हर्स ह्या२०२३ च्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटातून पवित्र प्रभाकर पदार्पण करेल. मिगुएल ओ'हाराच्या स्पायडर-फोर्सेसचा सदस्य म्हणून त्याला घेण्यात आले आहे. त्याला इंग्रजीत करण सोनी द्वारे आवाज देण्यात आला आहे . [१]

प्रकाशनाचा इतिहास[संपादन]

स्पायडर-मॅन: इंडिया #1 (जानेवारी 2005 ) ह्या पहिल्या अंकात पवित्र प्रभाकर पहिल्यांदा दिसला. [२] [३] [४] [५] [६]

काल्पनिक पात्राचे चरित्र[संपादन]

पवित्र प्रभाकर हा एक साधा भारतीय मुलगा एका दुर्गम गावातून असतो. त्याला आंशिक शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्याच्या काका-काकू भीम आणि माया यांच्यासोबत मुंबईला शिकायला जातो. काही वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलांचे निधन झालेले असते. त्याच्या नवीन शाळेतील इतर विद्यार्थी त्याच्या अभ्यासू स्वभावामुळे आणि साध्या राहणीसाठी त्याला चिडवतात आणि मारतात. त्याचे काका भीम त्याला आणि त्याच्या काकू मायाला मदत करण्यासाठी व त्याच्या शाळेची फी भरण्यासाठी धडपडत आहेत हे त्याला माहिती आहे. त्याच्या शाळेतील मीरा जैन हीच एक लोकप्रिय मुलगी त्याची मैत्रीण बनते.

ह्यादरम्यान, नलिन ओबेरॉय नावाचा स्थानिक गुन्हेगार एक ताबीज वापरतो. प्राचीन विधी करण्यासाठी वापरलेल्या त्या ताबीजातून त्याला एका राक्षसाने पछाडले आहे. जो पृथ्वीवर इतर राक्षसानी आक्रमण करण्यासाठीचे द्वार उघडू बघत आहे. गुंडांचा पाठलाग करत असताना, पवित्र प्रभाकर एका प्राचीन योगीला भेटतो.तो योगी त्याला जगाला धोक्यात आणणाऱ्या वाईटाशी लढण्यासाठी कोळ्याची शक्ती देतो. पवित्रने त्याच्या सामर्थ्याचा शोध घेत असताना अनेक पुरुषांनी हल्ला केलेल्या एका स्त्रीला मदत करण्यास नकार दिला. तो तेथून निघून जातो, पण त्याच्या काकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तो परत येतो आणि त्याला त्याचे काका मृत झाल्याचे कळते. भीमने महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला असता त्याला मारण्यात आल्याचे त्याला कळते. पवित्रला हे लक्षात येते की मोठ्या सामर्थ्यासोबत मोठी जबाबदारीही येते आणि तो इतरांच्या भल्यासाठी आपल्या शक्तींचा वापर करण्याची शपथ घेतो [२]

नलिन ओबेरॉय थोड्या वेळेसाठी पुन्हा माणूस बनतो आणि एका सामान्य डॉक्टरला चार जादुई हात (डॉक्टर ऑक्टोपसची भारतीय आवृत्ती) असलेल्या राक्षसात रूपांतरित करतो. राक्षसी आवाजाच्या सूचनेनुसार तो त्याला स्पायडर-मॅनला मारण्यासाठी पाठवतो. "डॉक ऑक" अयशस्वी होतो आणि स्पायडर-मॅनचे नायक म्हणून सार्वजनिक पदार्पण होते. वृत्तपत्रे मात्र त्याला धोकादायक म्हणून घोषित करतात. [२]

ओबेरॉयने पवित्र प्रभाकरच्या काकूचे अपहरण करून तिला मुंबईबाहेरील रिफायनरीत नेतो. तेथे तो डॉक्टर ऑक्टोपसचा विश्वासघात करून आणि त्याला समुद्रात उडवतो. स्पायडर-मॅन तिथे पोहोचून ओबेरॉयशी लढतो. ओबेरॉयने मीराचे देखील अपहरण केलेले असते. तो माया आणि मीरा या दोघींना रिफायनरीच्या वरून खाली ढकलतो. स्पायडर-मॅन आपल्या काकूंना वाचण्यासाठी डुबकी मारतो, परंतु मीराला वाचवण्यात अपयशी ठरतो. मात्र डॉक्टर ऑक्टोपस तिला वाचवतात. पवित्र मीराला आपली ओळख सांगून तिला त्याच्या काकूला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास सांगतो . [२]

तितक्यात ओबेरॉय डॉक्टर ऑक्टोपसचा नेहमी साठी काटा काढतो आणि ताबीजाने स्पायडर-मॅनला स्पर्श करतो. एक विषासारखा प्राणी त्या ताबीजातून बाहेर पडून स्पायडर-मॅनला गडद बाजूला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. पवित्रला त्याच्या काकांचे जबाबदारीबद्दलचे म्हणणे आठवते आणि वाईट गोष्टी नाकारत तो राक्षस आणि ओबेरॉय यांच्यातील दुवा तोडून ओबेरॉयला पुन्हा माणूस बनवतो. स्पायडर-मॅन ते ताबीज समुद्रात फेकतो आणि ओबेरॉयला मानसिक संस्थेत पाठवले जाते. [२]

अखेर मुंबईत शांतता प्रस्थापित होते. पवित्र प्रभाकर मीरासोबत राहणे सुरू करतो. शेवटी त्याला त्याच्या काकूसोबत दिवाळी साजरी करताना दाखवले आहे. कथेचा शेवट भगवद्गीतेतील एका अवतरणाने होतो. तो शेवट ते विष-राक्षस अजूनही जिवंत असल्याचे दाखवते. [२]

स्पायडर-व्हर्स[संपादन]

स्पायडर-व्हर्स कथानकादरम्यान पवित्र प्रभाकर कार्न नावाच्या एका नव्या रहस्यमय खलनायकाशी लढताना दिसला. स्पायडर-व्हर्स मध्ये विविध स्पायडर-मेन पर्यायी विश्वामध्ये दाखवले गेले. कार्न हा पवित्रला पहिल्यांदा राक्षस वाटला. सुपीरियर स्पायडर-मॅन (पीटर पार्करच्या शरीरातील डॉक्टर ऑक्टोपस) त्याला वाचवण्यात यशस्वी झाले आणि त्याला त्याच्या स्पायडरच्या सैन्यात भरती करण्यात आले. [७] सिक्रेट वॉर इव्हेंट दरम्यान सेट केलेल्या स्पायडर-व्हर्सच्या दुसऱ्या खंडात, पवित्र प्रभाकर स्वतःला अरॅचनिया नावाच्या युद्धविश्वात सापडतो. जिथे तो स्पायडर-ग्वेन, स्पायडर-हॅम, स्पायडर-मॅन नॉयर, स्पायडर-यूके, आणि अन्या कोराझोन, यांच्यासोबत सामील होतो .मात्र त्यांच्यापैकी कोणालाही मूळ स्पायडर-व्हर्स दरम्यानची त्यांची भेट आठवत नाही.

सिक्रेट वॉर्सच्या घटना संपल्यानंतर तयार झालेल्या सहा स्पायडर्सच्या गट आपले नाव बदलेल आणि वेब वॉरियर्स नावाच्या नवीन मालिकेत येणार आहे. हे नाव पीटर पार्करने अल्टीमेट स्पायडर-मॅन टीव्ही मालिकेत मूळ स्पायडर-व्हर्स दरम्यान तयार केलेले नाव आहे. [८]

स्पायडर-गेडॉन[संपादन]

" स्पायडर-गेडॉन " कथानकादरम्यान, पवित्र हा स्पायडर-गर्ल, स्पायडर-पंक, स्पायडर-यूके आणि मास्टर वीव्हर यांच्या मदतीने पृथ्वी-3145 वर लक्ष ठेवून आहेत. त्यांना असे आढळून येते की मागच्या वेळी पाहिल्यापासून इनहेरीटर्स कुपोषित झाले आहेत. [९]

इतर माध्यमात[संपादन]

  • स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स ह्या आगामी चित्रपटामध्ये मध्ये पवित्र प्रभाकर हा मिगुएल ओ'हाराच्या स्पायडर-फोर्सचा सदस्य म्हणून दिसणार आहे. त्याला करण सोनीने इंग्रजी आवाज दिला आहे. [१]
  • स्पायडर-मॅन अनलिमिटेडमध्ये पवित्र प्रभाकर हा निवड करून खेळण्या-योग्य पात्र म्हणून दिसतो .

स्वीकार[संपादन]

पवित्रला io9 च्या जेम्स व्हिटब्रुकने स्पायडर-मॅनचे चौदावे पर्यायी रूप म्हटले. तो स्पष्ट करतो, "जरी पवित्र हा स्पायडरमॅनच्या वारश्याशी बरेच साम्य ठेवून आहे तरी तो कदाचित मार्वलच्या आतापर्यंतच्या परदेशी स्पायडर-मॅन साठीच्या प्रयत्नांचे खूप चांगले उदाहरण आहे.". स्क्रीन रॅंटच्या रायन लिंचने पवित्रला दहावा क्रमांक दिला आहे. " या पात्रात त्याच्या अमेरिकन समकक्षांपेक्षा काही चतुर वेगळेपणा आहे, तरीही स्पायडर-मॅनला चांगले बनविणारी प्रत्येक गोष्ट त्यात उतरली आहे."असे मत त्याने व्यक्त केले. [१०] [११]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Polo, Susana; Patches, Matt; McWhertor, Michael (2022-12-13). "Every new Spider-Man: Across the Spider-Verse character, explained". Polygon (इंग्रजी भाषेत). 2022-12-13 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "Spider-Verse"" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  2. ^ a b c d e f Spider-Man: India #1-4
  3. ^ "Spider-Man, Swinging Through India". NPR. January 6, 2005
  4. ^ Overdorf, Jason. "A MULTICULTURAL WEB". Newsweek International. July 25, 2004
  5. ^ Sandhu, Sukhdev. "World Wide Web". New York Magazine May 21, 2005
  6. ^ "Spider-Man gets Indian make-over". BBC News. June 24, 2004
  7. ^ The Superior Spider-Man #32
  8. ^ "Spider-Gwen Stars in Web Warriors Launched by Mike Costa and David Baldeon #MarvelOctober (UPDATE)". 29 June 2015.
  9. ^ Spider-Geddon #0. Marvel Comics.
  10. ^ Whitbrook, James (7 July 2017). "The Greatest Spider-Men of All Time, Ranked". io9. 4 January 2018 रोजी पाहिले.
  11. ^ "11 Best Alternate Versions of Spider-Man". Screen Rant. 26 April 2016. 4 January 2018 रोजी पाहिले.

साचा:Spider-Man characters