पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओ
प्रसिद्ध कामे टॉय स्टोरी(१,२,३),कार्स्(१,२),अ बग्स लाइफ, वाल-ई,ईत्यादी.
पुरस्कार १६ अ‍ॅकडॅमी,७ गोल्डन ग्लोब,३ ग्रामी, ईत्यादी.
संकेतस्थळ
पिक्सार.कॉम


पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज् ही एक अमेरिकन अ‍ॅनिमेशन(चलचित्र) कंपनी आहे. याची सुरुवात इ.स. १९७९ साली लुकास फिल्म्सचा संगणक विभाग म्हणून ग्राफिक्स ग्रुप या नावाने झाली. इ.स. १९८६ मधे या स्टुडिओला अ‍ॅपल कंप्युटरचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी विकत घेतली, जी इ.स. २००६ मधे द वॉल्ट डिस्नी कंपनीने ७.४ अब्ज डॉलरला विकत घेतली.

या अ‍ॅनिमेशन स्टुडिओने जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अ‍कॅडमी पुरस्कार ,३ ग्रॅमी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे.

पिक्सारने आजपर्यंत १२ चित्रपटांची निर्मीती केली आहे. ज्याच्या निर्मीतीची सुरुवात इ.स. १९९५ ला टॉय स्टोरी या चित्रपटापासुन झाली.त्यानंनतर स्टुडिओने एकाहुन एक असे सरस चित्रपट तयार केले. यामधे इ.स. १९९८ मधील अ बग्स लाइफ , इ.स. १९९९ मधील टॉय स्टोरी २ , इ.स. २००१ मधील मॉन्स्टर्स इंक, इ.स. २००३ मधील फाइंडिंग नेमो, इ.स. २००४ मधील द इनक्रेडिबल्स, इ.स. २००६ मधे कार्स, इ.स. २००८ मधील वॉल-इ , इ.स. २००९ मधे अप , इ.स. २०१० मधे टॉय स्टोरी ३ आणि इ.स. २०११ मधील कार्स २ हे चित्रपट मुख्य आहेत. या पैकी इ.स. २०१० मधील टॉय स्टोरी ३ य चित्रपटाने आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज डॉलर इतकी कमाई केली आहे.