Jump to content

सौर चूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सौरचूल या पानावरून पुनर्निर्देशित)

सौरचूल म्हणजे सूर्याच्या ऊर्जेवर चालणारी चूल होय.

पेटीसदृश्य सौरचूल

कार्य

[संपादन]

सौरचुलीमध्ये सूर्यकिरणांचे एकवटणे हे तत्त्व वापरले जाते. मोठ्या आकारावरील सूर्यकिरणे कमी आकाराच्या भागावर पडतात तेव्हा त्या भागाला जास्त उष्णता मिळून तो भाग खूप तापतो. किरणे एकवटण्यासाठी भिंग,आरसे यांचा उपयोग करण्यात येतो.

सौरचुलीचे प्रकार

[संपादन]

पेटी म्हणजेच बॉक्स प्रकारची चूल

[संपादन]

घरगुती पातळीवर अन्न शिजवण्यासाठी

बॉक्स प्रकारच्या चूलीचे भाग व त्यांचे कार्य

  • बाहेरील चौकोनी पेटी - ही साधारणपणे गॅल्व्हनाइझ्ड (जीआय) प्रकारचे लोखंड, अ‍ॅल्युमिनियम किंवा फायबर रीएन्फोर्स्ड् प्लास्टिकपासून बनवतात.
  • काचेचे दुहेरी झाकण- आतील ट्रेवर बसणारे हे झाकण त्या पेटीपेक्षा किंचित मोठे असते. दोन काचांमध्ये २ सेंटिमीटर अंतर असते व त्या अ‍ॅल्युमिनियमच्या फ्रेममध्ये बसवलेल्या असतात. ह्या दोन काचांमधील हवेमुळे आतील उष्णता बाहेर शकत नाही. फ्रेमच्या कडांवर बसवलेल्या रबरी पट्टीमुळे उष्णता तेथूनदेखील बाहेर निसटू शकत नाही.
  • अन्न शिजवण्यासाठीची अ‍ॅल्युमिनियमची आतील पेटी (ट्रे) आकारमानाने बाहेरील पेटीपेक्षा किंचित लहान असते व तिला काळा रंग दिलेला असल्याने ती सूर्यप्रकाश सहजपणे शोषून घेऊन त्याची उष्णता अन्न ठेवलेल्या भांड्यांपर्यंत पोहोचवते.

बॉक्स चूल कशी वापरतात?-

  • मोकळ्या, सावली नसलेल्या जागेवर सौरचूल सूर्यप्रकाशात ठेवतात.


कॉन्सेन्ट्रेटर प्रकारची चूल (कम्युनिटी शेफलर्स चूल)

[संपादन]

ही अन्न मोठ्या प्रमाणात शिजवण्यासाठी उपयोगात आणतात. (शेफलर हे संशोधकाचे नाव आहे.).

अधिक वाचन

[संपादन]

निर्धूर चूल

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला". 2013-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-12 रोजी पाहिले.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


माहिती

संस्था