सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन
Indian television channel | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | दूरचित्रवाहिनी, broadcaster | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Sony Channel | ||
स्थान | भारत | ||
वापरलेली भाषा | |||
मालक संस्था |
| ||
मुख्यालयाचे स्थान | |||
चालक कंपनी |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (SET) ही भारतातील एक हिंदी मनोरंजन सशुल्क दूरचित्रवाणी वाहिनी आहे, जी ३० सप्टेंबर १९९५ रोजी सुरू झाली होती. जपानमधील सोनी कंपनीच्या कल्व्हर मॅक्स एंटरटेनमेंट या उपकंपनीकडे या वाहिनीची मालकी आहे.[१]
सोनीच्या युट्यूब वाहिनीला एकूण १२४ अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे ते तिसरे सर्वाधिक पाहिले गेलेले युट्युब चॅनल बनले; आणि १३८ दशलक्षाहून अधिक सदस्यांसह जुलै २०२२ पर्यंत ते तिसरे सर्वाधिक-सदस्यता घेतलेले युट्यूब चॅनेल बनले.
इतिहास
[संपादन]ही वाहिनी सप्टेंबर १९९५ मध्ये सुरू करण्यात आली. या वाहिनीने अनेक नाट्यमय आणि रिअॅलिटी शो प्रसारित करण्यास सुरुवात केली. सोनीने २००३ पर्यंत सर्व डिझ्नी चॅनलचे कार्यक्रम आणि डिझ्नी चित्रपट प्रसारित करण्यास सुरुवात केली. तसेच नंतर सीआयडी आणि क्राईम पेट्रोल देखील प्रसारित केले गेले.
२००६ मध्ये सोनीने बिग ब्रदर या प्रसिद्ध कार्यक्रमाचे बिग बॉस म्हणून रूपांतर केले. त्यांनतर अमेरिकन शो फिअर फॅक्टरचे फिअर फॅक्टर इंडिया असे रूपांतर केले. परंतु हे सर्व शो नंतर कलर्स टीव्हीवर हलविण्यात आले.
२००१ मध्ये वाहिनीचा लोगो हिरव्या रंगात बदलला. नंतर २०१६ मध्ये, लोगो जांभळ्या रंगात बदलला.
संदर्भ
[संपादन]- ^ www.sony.co.in https://www.sony.co.in/presscentre. 2022-08-01 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)[permanent dead link]