सय्यद घराणे
Appearance
(सैय्यद घराणे या पानावरून पुनर्निर्देशित)
fourth dynasty in Delhi Sultanate | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | dynasty | ||
---|---|---|---|
स्थान | दिल्ली सल्तनत | ||
राजधानी | |||
शासनप्रकार |
| ||
संस्थापक |
| ||
स्थापना |
| ||
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले |
| ||
धर्म | |||
| |||
सय्यद घराणे (रोमन लिपी: Sayyid dynasty) इ.स. १४१४ ते इ.स. १४५१ या कालखंडात दिल्लीच्या सल्तनतीवर अधिकारारूढ असलेले राजघराणे होते. तुघलक घराण्याच्या सत्तेनंतर सय्यदांची दिल्ली सल्तनतीवर सत्ता सुरू झाली. सय्यद घराण्यानंतर लोधी घराण्याने दिल्लीवर राज्य केले.
सय्यदांचा मुहम्मद पैगंबराचे आपण वंशज असल्याचा दावा होता. इ.स. १३९८ साली तैमूरलंगाने केलेल्या दिल्लीवरील आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतीवर कुणाचीच राजकीय पकड राहिली नाही. राजकीय अनागोंदीचा लाभ उठवत सय्यदांनी दिल्ली सल्तनतीची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. सय्यद घराण्याच्या ३७ वर्षांच्या शासनकाळात घराण्यातील चार व्यक्तींनी सल्तनतीवर राज्य केले.
सय्यद शासकांची सूची
[संपादन]- खिज्रखान सय्यद - इ.स. १४१४ ते इ.स. १४२१
- मुबारकशाह सय्यद - इ.स. १४२१ ते इ.स. १४३४
- मुहम्मदशाह सय्यद - इ.स. १४३४ ते इ.स. १४४५
- आलमशाह सय्यद - इ.स. १४४५ ते इ.स. १४५१
बाह्य दुवे
[संपादन]- एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ज्ञानकोशातील नोंद (इंग्लिश मजकूर)