Jump to content

सेबु पॅसिफिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेबु पॅसिफिक एर
विमान वाहतूक कंपनी, सार्वजनिक कंपनी, संस्था
स्थापना२६ ऑगस्ट 1988 संपादन
कार्यक्षेत्रlow-cost airline संपादन
संस्थापकJohn Gokongwei संपादन
देशफिलिपाईन्स संपादन
Airline allianceValue Alliance संपादन
Child organization or unitCebgo संपादन
मुख्यालयाचे स्थानसेबु शहर संपादन
स्टॉक एक्स्चेंजOTC Markets Group संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://cebupacific.vn संपादन
Item operatedएअरबस ए३२०, Airbus A320neo family, एअरबस ए३३०, ए.टी.आर. ७२ संपादन
UsesAMOS संपादन
Airline accounting code203 संपादन
IATA airline designator5J संपादन
ICAO airline designatorCEB संपादन

सेबु पॅसिफिक एर, सेबु पॅसिफिक, तथा सेबु एर, इंक ही फिलिपिन्समधील विमानवाहतूक कंपनी आहे. मनिलामध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीचा मुख्य तळ निनॉय ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असून इतर तळ माक्तान-सेबु आंतरराष्ट्रीय विमानतळ, क्लार्क आंतरराष्ट्रीय विमानतळ, फ्रांसिस्को बँगोय आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इलोइलो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहेत.

१९८८ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आशियातील पहिली किफायतशीर विमानसेवा असून ताफ्याच्या आकारानुसार फिलिपिन्समधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे.[] ही कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही ठिकाणांसाठी नियोजित विमान सेवा पुरवते.

आपल्या धंदा करण्याच्या किफायतशीर पद्धतीमुळे आणि विस्तृत गंतव्यस्थान जाळ्यामुळे २०१० मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार सेबू पॅसिफिक ही प्रतिस्पर्धी कंपनी फिलिपिन्स एरलाइन्सला मागे टाकत फिलिपिन्समधील सर्वात मोठी विमान कंपनी झाली. नागरी विमान वाहतूक मंडळाच्या आकडेवारीनुसार २०१० च्या पहिल्या तिमाहीत सेबू पॅसिफिकने एकूण २४.४५ लाख प्रवाशांना सेवा दिली. याच कालावधीत फिलिपिन्स एरलाइन्सने २३.३४ लाख प्रवाशांची वाहतूक केली होती.[][]

विमान ताफा

[संपादन]

२०२५ पर्यंतच्या सुमारास सेबु पॅसिफिक फक्त एरबसची विमाने वापरते.[][]

सेबु पॅसिफिक विमान ताफा
विमानसेवेतमागण्याप्रवासी संख्या []नोंदी
एरबस ए३२०-२००१५१८०आरपी-सी४१५६ आणि आरपी-सी४२६८ वर विशेष सजावट आहे.
एरबस ए३२० निओ२४१८८
१९४
एरबस ए३२१-२००२३० []
एरबस ए३२१ निओ२०८३२३६ []ऑक्टोबर २०२४ मध्ये ए३२० निओ परिवारासाठी ७० अतिरिक्त विमानांची मागणी नोंदवण्यात आली आहे. []
एरबस ए३३०-९००१४४५९यामध्ये आरपी-सी३९०६ या प्रायोगिक विमानाचा समावेश आहे.
एकूण८०९०

निवृत्त विमान ताफा

[संपादन]
बोईंग ७५७-२००
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३०
सेबु पॅसिफिकचा निवृत्त विमान ताफा
विमानएकूणसमावेशनिवृत्तपर्यायनोंदीसंदर्भ
एरबस ए३१९-१००१०२००५२०१८एरबस ए३२० निओ परिवारअलेजियंट एरला विकले.[१०]
एरबस ए३३०-३००२०१३२०२४एरबस ए३३०-९००विविध विमान कंपन्यांना विकले.
एटीआर ७२-५००२००८२०१५लागू नाहीसेबगो कडे वर्ग केले.
बोईंग ७५७-२००२०००२००६एरबस ए३२०-२००[११]
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३२१९१९९६२००५एरबस ए३१९सेबु पॅसिफिक फ्लाइट ३८७ चालवत असताना यातील एक विमान कोसळले.[११]

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Cebu Pacific Air SWOT: Asia's first LCC, Philippines market leader". Center for Aviation (इंग्रजी भाषेत). August 25, 2018.
  2. Thomas, Geoffrey (9 June 2010). "Cebu Pacific Now Philippines' Largest Airline". Air Transport World (इंग्रजी भाषेत). 2013-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 September 2016 रोजी पाहिले.
  3. "Philippine Airlines Struggling as Cebu Pacific Becomes Largest Carrier". Center for Aviation (इंग्रजी भाषेत). September 3, 2010. 9 September 2016 रोजी पाहिले.
  4. "Our Fleet". Cebu Pacific (इंग्रजी भाषेत). May 31, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-04-02 रोजी पाहिले.
  5. "Orders and deliveries (updated monthly)". Airbus (इंग्रजी भाषेत). April 3, 2024. September 11, 2024 रोजी पाहिले.
  6. "Cebu Pacific Upgauges with 460-Seat A330neo, 240-Seat A321XLR and 194-Seat A320neo". The Blue Swan Daily (इंग्रजी भाषेत). June 21, 2019. June 22, 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-21 रोजी पाहिले.
  7. "Our Fleet – Airbus A321CEO". Cebu Pacific. April 19, 2025.
  8. "Philippines Domestic Market: Airport Constraints Restrict Growth". Centre for Aviation (इंग्रजी भाषेत). May 5, 2018.
  9. Piad, Tyrone Jasper C. (October 4, 2024). "Cebu Pacific places P1.4-T order for Airbus jets". Philippine Daily Inquirer. October 4, 2024 रोजी पाहिले.
  10. "Cebu Pacific to sell more A319 aircraft in line with fleet upgrade". PortCalls Asia. May 16, 2016. November 29, 2022 रोजी पाहिले.
  11. 1 2 चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; "fleet2005" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  12. "Accident Description". Aviation Safety Network (इंग्रजी भाषेत). ९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. Ranter, Harro. "ASN Aircraft Accident ATR 72-212A (ATR-72-500) RP-C7254 Manila-Ninoy Aquino International Airport (MNL)". aviation-safety.net (इंग्रजी भाषेत). २३ मार्च २०१९ रोजी पाहिले.
  14. Manlupig, Karlos (2013-06-02). "Cebu Pacific Plane Overshoots Davao Airport Runway; Passengers Unhurt". Inquirer.net (इंग्रजी भाषेत). २ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  15. Wilson, Darryl. "Cebu Pacific Issues Apology, Passengers Unsatisfied". Philippine Flight Network. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  16. "Cebu Pacific Airbus A330-300 at Cebu City on Aug 4th 2017, Runway Excursion During Backtrack". AeroInside (इंग्रजी भाषेत). सप्टेंबर ७, २०१७.
  17. "Cebu Pacific plane overshoots Iloilo airport runway". GMA News (इंग्रजी भाषेत). २० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
  18. "Cebu Pacific Airbus A-320 at Zamboanga on Apr 23rd 2018, Nose Gear Steering Fault After Landing". AeroInside (इंग्रजी भाषेत). २४ एप्रिल २०१८. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.