सेप्पुकु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेप्पुकु (जपानी:切腹; पोट फाडणे) तथा हाराकिरी हा जपानमध्ये पूर्वी प्रचलित असलेला आत्महत्या करण्याचा मार्ग होता.

याचा अवलंब सहसा सामुराई योद्धे करीत असत. लढाईत हरल्यावर शत्रूच्या हाती लागून छळ सहन करण्याऐवजी स्वतःच्याच पोटात तलवार खुपसून घेउन सामुराई स्वतःचा जीव घेत असत. एखाद्या गंभीर गुन्ह्याबद्दल दोषी ठरलेल्या सामुराईलाही सेप्पुकु करून घेउन मृत्युदंड घेण्याची परवानगी दिली जात असे. शत्रूच्या हातून मृत्यू येणे किंवा देहदंड मिळणे यापेक्षा सामरई सेप्पुकु करणे पसंत करीत.