Jump to content

सुशीला मूल-जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुशीला मूल-जाधव ह्या आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत व लेखिका होत्या. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाच्या पाली विभागप्रमुख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाली व बुद्धीझम विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.[][][][]

पुस्तके

[संपादन]

सुशीला मूल-जाधव यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. राज्य शासनाच्यावतीने प्रकाशित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रग्रंथाच्या १६व्या खंडाच्या पालिव्याकरण विषयक ग्रंथाच्या मुद्रीतशोधनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.[]

सुशीला मूल-जाधव यांची काही पुस्तके खालीलप्रमाणे आहेत

‘सम्बुद्ध’, ‘भगवान बुद्ध’, ‘तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्री,’ ‘पालिभाषा परिचय’, ‘बुद्धनीतीकथा’, ‘तू खरंच सुंदर आहेस’, ‘बेबीचा वाढदिवस’, ‘नामांतर शहीद गौरवग्रंथ’

निधन

[संपादन]

त्यांचे १६ सप्टेंबर रोजी स्थानिक कामठी मार्गावरील व्हिनस हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर १७ सप्टेंबर रोजी वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.[]

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "आंबेडकरी विचारवंत प्रा. सुशीला मूल-जाधव यांचे निधन". Maharashtra Times.
  2. ^ "आंबेडकरी चळवळीतील शिलेदारांचा सत्कार". Lokmat. 9 जुलै, 2018. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "स्त्री-पुरुष समानतेचा मार्ग सांगणारा बुद्ध धर्म - प्रा. सुशीला मूल-जाधव". Divya Marathi. 30 मे, 2013. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ https://divya-m.in/jAahfXRvW8
  5. ^ News, FrontPage. "भिमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर". www.frontpage.ind.in. 2021-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-18 रोजी पाहिले.