दख्खनची राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दख्खनची राणी
माहिती
सेवा प्रकार सुपरफास्ट
प्रदेश महाराष्ट्र, भारत
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी मध्य रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनस
थांबे
शेवट पुणे
अप क्रमांक 12124
डाउन क्रमांक 12123
अंतर १९२ किमी
साधारण प्रवासवेळ ३ तास १५ मिनिट
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग वातानुकुलित खुर्चीयान,4
अपंगांसाठीची सोय नाही
बसण्याची सोय विमानाप्रमाणे सहा आसनांची रांग (वाखु)
१२ आसनांचा कंपार्टमेंट
झोपण्याची सोय नाही
खानपान डायनिंग कार, फेरीवाले कंत्राटी विक्रेते
सामान ठेवण्याची सोय प्रवासी कंपार्टमेंटमध्येच
इतर सुविधा पासधारक डबे
तांत्रिक माहिती
डबे, इंजिने, इ.

डब्ल्यु.ए.पी.5 इंजिन
अधिक २ डब्ल्यू.ए.जी.5 इंजिन (कर्जत ते लोणावळा) २ एस.एल.आर डबे
४ वातानुकुलित खुर्चीयान (२ पासधारकांसाठी आरक्षित)
६ दुसरा वर्ग (३ पासधारकांसाठी आरक्षित)

१ डायनिंग कार
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग

दख्खनची राणी ही महाराष्ट्राच्या मुंबईपुणे या शहरांदरम्यान रोज धावणारी एक खास रेल्वेगाडी आहे. ही गाडी असंख्य चाकरमान्यांचे रोजचे प्रवासाचे साधन आहे.

वेळापत्रक[संपादन]

जून १, २००९ रोजी दख्खनच्या राणीच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त सजवलेले इंजिन.

दख्खनची राणी पुणे स्थानकावरून दर दिवशी सकाळी सव्वासात (७:१५) वाजता प्रयाण करते व सव्वातीन तासांनी सकाळी साडेदहा (१०:३०) वाजता मुंबईच्या छ्त्रपती शिवाजी टर्मिनस (व्हीटी)ला पोहोचते. तिचा परतीचा प्रवास त्याच दिवशी सायंकाळी ५:१० वाजता छ्त्रपती शिवाजी टर्मिनसहून चालू होतो व रात्री ८:२५ वाजता पुणे स्थानकावर संपतो. ही गाडी एका दिशेने १९२ किलोमीटर अंतर धावते.

दख्खनची राणी ही पुण्याहून निघून थेट मुंबईला जाणारी गाडी असल्याने तिच्या प्रवासाठी अधल्या मधल्या स्टेशनची तिकिटे मिळत नाही. पासहोल्डर्सचे तीन डबे सोडल्यास गाडीचे सर्व डबे आरक्षित तिकिटे असणार्‍यासाठीच असतात. दख्खनच्या राणीचे गाडी (पुणे ते मुंबई प्रवासाकरिता) क्रमांक १२१२४ व १२१२३ (मुंबई ते पुणे प्रवासाकरिता), असे आहेत. खंडाळा व मंकी हिल हे तांत्रिक थांबे आहेत. येथे जायला तिकिटे मिळत नाहीत.

डेक्कन क्वीनला आधी फक्त वरच्या दर्जाचे डबे होते. कालांतराने तिला थर्ड क्लासचे डबे जोडले गेले. या थर्ड क्लासलाच पुढे सेकंड क्लास म्हणू लागले.

स्थानक

कोड

स्थानक

नाव

१२१२३ १२१२४
आगमन निर्गमन अंतर (किमी) आगमन निर्गमन अंतर (किमी)
CSTM मुंबई सीएसटी स्रोत १७:१० १०:२५ गंतव्य १९२
DR दादर थांबा नाही १०:०३ १०:०५ १८३
KJT कर्जत १८:३३ १८:३५ १०० थांबा नाही ९२
MNHL मंकी हिल थांबा नाही १२० ८:२० ८:२१ ७२
KAD खंडाळा थांबा नाही १२५ ८:१५ ८:१६ ६७
LNL लोणावळा १९:१९ १९:२० १२८ ८:०९ ८:१० ६४
SVJR शिवाजीनगर २०:०९ २०:१० १९० थांबा नाही
PUNE पुणे २०:२५ गंतव्य १९२ स्रोत ७:१५

इतिहास[संपादन]

दख्खनची राणी जून १, १९३० रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुरू झाली.[१] त्या वेळेस ती फक्त शनिवारी व रविवारी धावायची. तिचा उपयोग प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई व पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी होत. हळूहळू तिच्या सेवेचा विस्तार करण्यात आला व दख्खनची राणी या दोन शहरांदरम्यान रोज धावू लागली. सुरवातीला ही गाडी लकझरी गाडी म्हणून सुरू झाली, त्यामुळे तिच्यात फक्त वरचे दोन वर्ग होते. ह्या गाडीचा पहिला प्रवास कल्याण ते पुणे असा झाला. आता ती कल्याणला थांबत नाही. मुंबईच्या दिशेने जाताना दादर आणि पुण्याच्या दिशेने जाताना शिवाजीनगर हे दोन थांबे सुरुवातीला अनेक वर्षे नव्हते.

डेक्कन क्वीनने रोज प्रवास करणार्‍यांची संख्या सुमारे ३,५०० आहे.

अलिकडील घटना[संपादन]

दख्खनची राणी १९९० साली खंडाळ्याजवळ रूळांवरून घसरली होती. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नोव्हेंबर ३० २००६ रोजी दलितांच्या एका संतप्त जमावाने उल्हासनगर जवळ गाडी थांबवली व प्रवाशांना बाहेर काढले. यानंतर जमावाने गाडीचे ७ डबे पेटवले. हा जमाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कानपुरमध्ये झालेल्या विटंबनेचा निषेध करीत होता.[२]

मार्च ८, इ.स. २०११ रोजी सुरेखा शंकर यादव ही डेक्कन क्वीन चालवणारी पहिली स्त्री मुख्य चालक झाली.

जून 1, इ.स.2019 पासुन या गाडीला अत्याधुनिक एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Deccan Queen turns 75". 2004-06-01. 2006-11-30 रोजी पाहिले. 
  2. ^ http://www.timesnow.tv/Sections/News/Dalits_go_on_a_rampage/articleshow/650600.cms